घरमुंबईनवर्षात जीवदानाची भेट; दीर्घ प्रतिक्षेनंतर मेव्‍हणीकडून मिळाले मूत्रपिंड!

नवर्षात जीवदानाची भेट; दीर्घ प्रतिक्षेनंतर मेव्‍हणीकडून मिळाले मूत्रपिंड!

Subscribe

मालाडच्‍या ४० वर्षीय व्‍यक्‍तीला त्याच्या मेव्हणीने मूत्रपिंड दान करुन त्यांना नवीन जीवनदान दिले आहे.

मालाडच्‍या ४० वर्षीय व्‍यक्‍तीला त्‍याच्‍या मेव्हणीने मूत्रपिंड दान केल्यामुळे त्यांना जीवदान मिळालं आहे. जमालुद्दीन खानला मागील दोन वर्षे खूपच थकवणारी आणि त्रासाची गेली. २०१६ मध्‍ये ‘ऑटोसोमल डोमिनण्‍ट पॉलिसायस्टिक’ या किडनी आजारामुळे जमालुद्दीनचे क्रोनिक किडनी डिसीजसह याचे निदान झाले होते. ऑटोसोमल डोमिनण्‍ट पॉलिसायस्टिक किडनी हा आनुवांशिक आजार आहे. निदान झाल्‍यानंतर दोन वर्षांसाठी जमालुद्दीनच्‍या नित्‍यक्रमामध्‍ये खूपच बदल झाला. त्‍याची काळजी घेण्‍यासोबतच औषधोपचार देखील सुरू करण्‍यात आले. पण त्‍याचा काहीच परिणाम झाला नाही. कन्‍सल्‍टण्‍ट नेफ्रोलॉजिस्‍ट आणि ट्रान्‍सप्‍लाण्‍ट फिजिशियन डॉ. राजेश कुमार यांच्‍या देखरेखीखाली त्‍याची काळजी घेण्‍यात येत होती.

मेव्‍हणी मूत्रपिंड केले दान

जून २०१८ मध्‍ये डॉ. कुमार यांनी डायलिसिस करण्‍याचा सल्‍ला दिला, कारण त्‍याला अॅक्‍युट किडनी फेल्‍युरचा त्रास झाला होता. जमालुद्दीनसमोर संपूर्ण आयुष्‍यभर डायलिसिस करण्‍याचा किंवा मूत्रपिंड प्रत्‍यारोपण करण्‍याचा पर्याय होता. हार न मानता त्‍याने डॉक्‍टरांसोबत सल्‍लामसलत केल्‍यानंतर प्रत्‍यारोपण करण्‍याचा निर्णय घेतला आणि त्‍यानुसार फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल – एसएल रहेजा हॉस्पिटल येथे पुढील उपचार सुरू केले. सविस्‍तर वैद्यकीय तपासणी केल्‍यानंतर त्‍याच्‍या कुटुंबातील सदस्‍यांची चाचणी घेण्‍यात आली आणि त्‍याच्‍या कुटुंबातील जुळणारा घटक मिळाला. जमालुद्दीनची ३३ वर्षीय मेव्‍हणी मायरुन नेशाने तिचे मूत्रपिंड दान करायला मंजूरी दिल्‍यानंतर हे प्रत्‍यारोपण शक्‍य झाले.

- Advertisement -

यशस्‍वीरित्‍या मूत्रपिंडाचे प्रत्‍यारोपण

४ डिसेंबर २०१८ रोजी डॉक्‍टर्स आणि परिचारिकांच्‍या टीमने यशस्‍वीरित्‍या मूत्रपिंड प्रत्‍यारोपण करत जमालुद्दीनला नवीन जीवनदान दिले. मूत्रपिंड दात्‍याने देखील चांगला प्रतिसाद दिला आणि तिला ८ डिसेंबर २०१८ रोजी डिस्‍चार्ज देण्‍यात आले. जमालुद्दीनला १८ डिसेंबर २०१८ रोजी डिस्‍चार्ज देण्‍यात आला.


वाचा – महिलेच्या अवयवदानामुळे ५ वर्षाच्या मुलाला जीवदान

- Advertisement -

वाचा – टिळकनगर आग प्रकरण; ‘यांनी’ दिले २५ जणांना जीवनदान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -