घरमुंबईजोगेश्वरी स्थानकावर यापुढे 'या' सहा लोकल थांबणार नाही

जोगेश्वरी स्थानकावर यापुढे ‘या’ सहा लोकल थांबणार नाही

Subscribe

१ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर लोकल गाड्यांचे नवीन वेळापत्रक पश्चिम रेल्वेने लागू केले. गर्दीच्या वेळी आणखी लोकल फेऱ्यांची भर,२६ लोकल गाड्यांच्या वेळा बदलतानाच यातील काही गाड्या जलद करण्यात आल्या आहेत

पश्चिम रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जोगेश्वर रेल्वे स्टेशनवर यापुढे चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा फास्ट लोकल थांबणार नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळीतील या लोकल रद्द केल्यामुळे जोगेश्वरीवरु फास्ट लोकलने प्रवास करणाऱ्या प्रावाशांचे प्रचंड हाल होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे याविरोधात तक्रार दिली आहे. नाराज झालेल्या प्रवाशांनी जोगेश्वरी स्थानकावर याविरोधात रेलरोको करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जोगेश्वर स्टेशनवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

१ नोव्हेंबरपासून लोकल गाड्यांचे नवीन वेळापत्रक पश्चिम रेल्वेने लागू केले. गर्दीच्या वेळी आणखी लोकल फेऱ्यांची भर,२६ लोकल गाड्यांच्या वेळा बदलतानाच यातील काही गाड्या जलद करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे अनेक बदल पश्चिम रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या बदलामुळे जोगेश्वर स्टेशवरुन चर्चगेटकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.

- Advertisement -

या गाड्या यापुढे नाही थांबणार

जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलचे थांबे रद्द केले आहेत. यामुळे सकाळच्या वेळत जाणाऱ्या म्हणजे ८.१५ वाजता, ८.२४ वाजता, ८.४४ वाजता, ९.०५ वाजता, ९.३६ वाजता आणि ९.५९ वाजताच्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर यापुढे थांबणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -