घरमुंबईमीरारोडच्या बहाद्दराचा अजब विक्रम; पठ्ठ्याला सगळ्याच विषयांत ३५!

मीरारोडच्या बहाद्दराचा अजब विक्रम; पठ्ठ्याला सगळ्याच विषयांत ३५!

Subscribe

मीरारोड परिसरात राहणाऱ्या अक्षित जाधवला दहावीच्या परीक्षेत अचूक ३५ टक्के मिळाले असून प्रत्येक विषयात देखील त्याला ३५ मार्कच मिळाले आहेत.

दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रत्येक पालक आपल्या विद्यार्थ्याला अमूकअमूक टक्के मिळाल्याचे सांगत आनंद व्यक्त करतात. तर काही अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यावर संताप व्यक्त करतात. मात्र मिरारोडमधील अक्षित जाधव या विद्यार्थ्याने ३५ टक्के गुण मिळवल्याने त्याच्या घरातील पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘अचूक ३५ टक्के गुण मिळवणे हा एक प्रकारचा विक्रम आहे. अशाप्रकारे अचूक गुण मिळवणे कठीण बाब असते. पण आमच्या विद्यार्थ्याला मिळालेल्या ३५ टक्क्यांमुळे आम्हाला त्याने ९९ टक्के गुण मिळवल्याचा आनंद झाला’, अशी प्रतिक्रिया अक्षितचे वडील गणेश जाधव यांनी ‘आपलं महानगर’शी व्यक्त केली. गेल्या वर्षी अशा प्रकारचे काही निकाल लागले होते. यंदा मात्र ३५ टक्के आणि सगळ्या विषयांत ३५ मार्क मिळवणारा अक्षित हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे!


हे वाचलंत का? –…म्हणून यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरला; वाचा कारण!

- Advertisement -

प्रत्येक विषयात अक्षितची ‘पस्तिशी’!

मिरारोडच्या सेक्टर ५ मधल्या शांतीनगरमध्ये राहत असलेल्या अक्षित जाधव याला ३५ टक्के मिळाल्याचे कळताच त्याला थोडावेळ काहीही सुचेनासे झाले. अक्षितला ३५ टक्के आणि प्रत्येक विषयात देखील बरोबर ३५ मार्कच पडले आहेत. त्यामुळे हा अजब निकाल पाहून त्याचे डोळे क्षणभर चक्रावले. त्याने ही माहिती त्याच्या घरातल्यांना दिल्यावर त्यांनी अक्षितचा निकाल सकारात्मक पद्धतीने घेतला. अक्षितला ५० टक्के गुण मिळतील अशी त्याच्या आईवडिलांना अपेक्षा होती. परंतु अक्षितला अचूक ३५ टक्के मिळाल्याचे कळल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला.


हेही वाचा – १०वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

हे कसं शक्य आहे?

‘अक्षित नववीमध्ये अनुतीर्ण झाल्याने तो १७ क्रमांकाचा अर्ज भरून परीक्षेला बसला होता. अक्षित हा मिररोडच्या शांतीनगर हायस्कूलमध्ये शिकायला होता’, अशी माहिती गणेश जाधव यांनी दिली. गणेश जाधव हे वांद्रे येथील डायमंड मार्केटमध्ये हिरे चेकिंगचे काम करतात, तर त्याची आई गृहिणी आहे. ‘एखादा विद्यार्थी एक-दोन गुणांनी अनुतीर्ण होणार असेल, तर त्याला अधिक गुण वाढवून दिले जातात. अक्षितच्या बाबतीत हाच प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला अचूक ३५ टक्के गुण मिळाले असण्याची शक्यता’, असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -