घरमुंबईएसटीची स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित

एसटीची स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित

Subscribe

मुंबई सेंट्रल आगारातून ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीस प्रारंभ

एसटी महामंडळातर्फे बहुचर्चित स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ मुंबई सेंट्रलच्या आगारातून सुरू करण्यात आला आहे. विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण आणि विभागीय सांख्यिकी अधिकारी एकनाथ मगदूम व आगार प्रभारक श्रीरंग बरगे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांची नाव नोंदणी करून मंगळवारी ही बहुचर्चित स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

एसटी बसेसने प्रवास करणार्‍या जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची योजना मुंबई सेंट्रल आगारातून मंगळवारी सुरू करण्यात आली आहे. या पूर्वी प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्यातही योजना सुरू होती. मात्र आताही योजना प्रत्यक्षात मुंबई सेंट्रल आगारातून सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल आगारातून पहिले स्मार्ट कार्ड घेणारे प्रवासी विनायक कांशीराम गुरव, यांना स्मार्ट कार्ड नोंदणीची पावती प्रदान करून या स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ केला आहे. राज्य सरकारने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे. परंतु बनावट कार्ड वापरून अनेकजण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बनावट कार्डधारकांना आळा घालण्यासाठी आधुनिक स्मार्ट कार्ड योजना आणली आहेत, सर्व प्रथम कार्डधारकांना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित करण्याचे काम सध्या मुंबई सेंट्रल आगारात सुरु झाले आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ नागरिकांना अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर ठेऊन आधार कार्डसी संलग्न माहिती प्राप्त झाल्यानंतर या स्मार्ट कार्डची नोंदणी करता येईल. त्यानंतर पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी कार्ड प्राप्त होईल. आगारातील आरक्षण खिडकीवर नागरिकांनी नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी करीत असताना स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये इतके शुल्क घेण्यात येत असून त्या नंतर तयार स्मार्ट कार्ड त्यांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -