घरमुंबईकेईएममधील दुघर्टनेप्रकरणी डिन यांना करा निलंबित

केईएममधील दुघर्टनेप्रकरणी डिन यांना करा निलंबित

Subscribe

शॉर्टसर्किटमुळे केईएम हॉस्पिटलमध्ये अडीच महिन्यांचा चिमुरडा गंभीर जखीम झाला होता. याच पार्श्वभूमीवर समिती सदस्यांनी जखमी प्रिन्सला १० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात शॉर्टसर्किटमुळे अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला. या दुर्दैवी घटनेला आठ दिवस उलटत आल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने याचे तीव्र पडसाद स्थायी समितीत उमटले. प्रिन्सला झालेला हा अपघात नसून निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत याप्रकरणात प्रिन्सच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जावी,अशी मागणी सदस्यांनी केली आहे. तसेच केईएम रुग्णालयाचे अधिष्ठातासह(डिन) संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समिती सदस्यांनी केली आहे.

अपघात नाहीतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा

केईएम रुग्णालयातील बालरोग विभागात प्रिन्स राजभर या बालकाचा ईसीजी करताना मशीनमध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीमध्ये हात आणि कानाला गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे या बालकाच्या कुटुंबाला महापालिकेने कोणती नुकसान भरपाई दिली आहे किंवा किती मदत दिली जाणार आहे, अशी विचारणा भाजपच्या राजेश्री शिरवाडकर यांनी केली. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह प्रशासनातील अधिकारी त्या मुलाला पाहण्यास गेलेले नाही. कारण ते गरीब कुटुंब आहे म्हणून. शिवसेनेच्या आमदारांनी मालाडला भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना १० लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर मग या मुलाला ही १० लाखाची रक्कम का दिली जात नाही. ही रक्कम त्यांना द्यायला हवी. कारण हा अपघात नाहीतर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुलाच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाल्याची चिंता केली व्यक्त 

या मुलाचा ईसीजी काढताना जर हा प्रकार घडला तर मुलगा एवढा भाजला जाईपर्यंत त्याला कुणीच कसे पाहिले नाही, असा सवाल करत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी या घटनेमुळे त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ज्या अर्थी अशी घटना घडत आहे, त्याअर्थी ही यंत्रणा फूलप्रुफ नसल्याचा आरोप करत बालकाला नुकसान भरपाईची रक्कम मिळायला हवी,अशी मागणी केली.

केईएम रुग्णालयाचे डिन यांना याप्रकरणात निलंबित करण्यात यावे

शॉर्टसर्कीटची घटना धक्कादायक असून महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील यंत्रांची ऑडीट करण्यात यावे. तसेच केईएम रुग्णालयाचे डिन यांना याप्रकरणात निलंबित करण्यात यावे आणि जखमी प्रिन्सला नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये द्यायला हवे. आज जर महापालिकेने योग्यती कार्यवाही न केल्यास कोणताही रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात दाखल होणार नाही, तो खासगी रुग्णालयात जातील, अशीही भीती भाजपचे महापालिका गटनेते व खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केली. या बालकावरील सर्व उपचाराचा खर्च माफ करण्यात यावा अशी सूचना राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. तर चौकशी करेपर्यंत जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदस्यांनी केलेल्या मागणीबाबत ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

- Advertisement -

प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी उत्तर देताना, या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासकीय अधिकार्‍यांमार्फत चौकशी केली जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, याप्रकरणाबाबत सविस्तर माहिती पुढील बैठकीत सादर केली जाईल, असे आश्वासन दिले.


हेही वाचा – स्वच्छ सर्वेक्षणासाठी सल्लागारांची गरज काय? ‘स्थायी’मध्ये तीव्र विरोध!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -