घरमुंबईआजपासून सांताक्रूझ पादचारी होणार सुरू

आजपासून सांताक्रूझ पादचारी होणार सुरू

Subscribe

‘महानगर’च्या पाठपुराव्याला यश , मनसेच्या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासन बनले सक्रिय

मागील कित्येक महिन्यांपासून सांताक्रूझ रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या पादचारी पुलाचे काम रखडून पडले होते. नव्या वर्षात हा पूल प्रवाशांसाठी मंगळवारपासून खुला करण्यात येणार आहे. या पादचारी पुलाच्या कामाच्या दिरंगाईबद्दल दैनिक ‘आपलं महानगर’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा लावून धरला, तसेच पूल पूर्ण करण्यासाठी अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर रेल्वेने या पादचारी पुलाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केले असून हा पूल १ जानेवारीपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मागील कित्येक महिन्यांपासून सांताक्रूझ रेल्वे स्थानकांचा पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या पादचारी पुलाचे काम रखडून पडले होते. त्यामुळे सांताक्रूझ रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर तुडूंब गर्दी दिसून येत होती. त्यामुळे इथेही एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचे चिन्ह दिसून येत होते. यासंबंधी सर्व प्रथम दैनिक ‘आपलं महानगर’ने ‘सांताक्रुझवर एल्फिन्स्टनचे सावट’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेत अपूर्णावस्थेत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पश्चिम रेल्वेकडे केली होती. त्यावेळी रेल्वेने पुलाच्या कामासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतली होती. मात्र मुंबई महानगर पालिकेच्या कामचुकारीपणामुळे सांताक्रूझ रेल्वे स्थानकांच्या पादचारी पुलाचे काम रखडत होते. रेल्वेने ३ वेळा बीएमसीला पत्र पाठवूनही पादचारी पुलाजवळील जागा खाली करून दिली नव्हती. अखेरीस मनसेच्या दणक्याने रेल्वे प्रशासनाने या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर ही डेडलाईन ठरवली. त्यानुसार पुलाच्या कामाला गती आणून हा पूल दिलेल्या वेळेत पूर्ण केली.

- Advertisement -

1971 साली बांधला होता पादचारी पूल
महापालिकेने सांताक्रूझ स्थानकावरील 90.3 मीटर लांब आणि सहा मीटर रुंद पादचारी पूल हा 1971 साली बांधला होता. या पादचारी पुलाची पडझड झाल्याचे ऑगस्टमध्ये झालेल्या संयुक्त निरीक्षणात आढळून आले होते. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता.

पुलाच्या पूर्वे दिशेकडील भाग हा ३१ जानेवारी २०१९ रोजी खुला करण्यात येणार आहे. कारण या पायर्‍याच्या खाली एमसीजीएम ऑफिस आणि पे अ‍ॅण्ड युज टॉयलेट आहे, त्याला तोडण्याचे काम सध्या बाकी आहे. सोबतच या पादचारी पुलाच्या पश्चिम दिशेने महापालिकेच्या घनकचरा विभागाचे कार्यालय आहे, जे अतिक्रमित आहे, तेही हटविण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे संपूर्ण पूल खुला करण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे.
– रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -