घरदेश-विदेशनववर्षाच्या शुभेच्छांपासून सावधान

नववर्षाच्या शुभेच्छांपासून सावधान

Subscribe

सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक होण्याची शक्यता

कोणताही सण असो अथवा उत्सव हल्ली सोशल मिडीयावरील व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यावर वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जातात. खास करुन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याकडे जास्त कल असतो. मात्र अशा शुभेच्छांच्या संदेशातून वैयक्तीक माहिती चोरली जाण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे तुमचे सोशल साईटवरील अकाऊंट हॅक केले जाऊ शकते, तसेच त्या माहितीद्वारे तुमच्या बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला सायबर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिला आहे.

२०१८ सालची सांगता होत असून दोन दिवसांपासूनच सोशल मिडियातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यातील काही शुभेच्छांच्या संदेशांमध्ये वैयक्तीक माहिती चोरता येईल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, असा दावा सायबर पोलिसांनी केला आहे. दरवेळी पोलिसांकडून हे आव्हान करण्यात येते मात्र त्याकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करतो, त्यामुळे याचा फटका नंतर लोकांना बसतो.

- Advertisement -

वेगवेगळ्या शुभेच्छा देत असताना मोबाईल वापरणारे बरेच जण थर्ड पार्टी अ‍ॅपलिकेशन वापरतात. त्यात लिंकही पाठवल्या जातात, त्या लिंकवर क्लीक केल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पर्याय मिळेल असे त्यात लिहिलेले असते. त्या लिंकवर क्लीक करुन ते ओपन करताच तिथे स्वत:चे नाव आणि इतर माहिती भरण्यास सांगितली जाते, सोबत तुमचा फोटोदेखील अपलोड करण्याची मुभा असते. या अनोख्या फंड्याद्वारे संपूर्ण वैयक्तीक माहिती मिळवली जाते. तसेच युजर लगेच ती लिंक समोंरच्यालाही फॉरवर्ड करतो. ज्यामुळे ज्या फेस्टीवलच्या शुभेच्छा तुम्हाला द्यायच्या आहेत त्या शुभेच्छा तुमच्या फोटो आणि नावासहित समोरच्याला मिळतात. पण ज्याठिकाणी तुम्ही ही सगळी माहिती भरता ते अ‍ॅप्लीकेशन्स अधिकृत नसल्याने तुमची माहिती चोरली जाते, ज्यामध्ये तुमच्या हाताच्या बोटांचे ठसे (फिंगर प्रिंट)चा सामावेश असू शकतो, त्याद्वारे ‘आधार’ची माहिती मिळवून बँक खात्यातील पैसेही लांबवले जावू शकतात, त्यामुळे अशा शुभेच्छांच्या संदेशाबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यात तुमची खासगी माहिती मिळवण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जातात. आम्ही वारंवार लोकांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करत असतो, मात्र तरीही लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा साध्या पद्धतीने शब्दरुपातही देता येऊ शकतात, त्याचा अधिकाधिक वापर करण्यात यावा. उगाच विविध अ‍ॅप्लीकेशनद्वारे संदेश पाठवू नये.
-रवि सरदेसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -