घरमुंबईLockDown: दोन दिवसांपासून जेवायला नाही म्हणून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

LockDown: दोन दिवसांपासून जेवायला नाही म्हणून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

वेळेस पोलीस आल्याने पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला महिलेचे प्राण

देशभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र यादरम्यान ज्याचे हातावर पोट आहे अशा लोकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जेवायला अन्न मिळाले नसल्याने महिलेने शुक्रवारी जे.जे पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेस पोलीस आल्याने पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचवणे शक्य झाले.

असा घडला प्रकार

शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मलाड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे हे आपल्या रात्र-पाळीच्या ड्युटीसाठी दुचाकीवरून निघाले होते. वाटेतून जात असताना जे जे पुलावरून एक महिला उडी मारताना त्यांना दिसली. दुचाकी थांबवत ते महिलेकडे गेले. तिला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

मात्र ती महिला ऐकायला तयार नव्हती मला मरूद्या असे रडत आपले दुखः सांगत होती. पोलीस देशपांडे यांनी तिला समजवत तिला मदत करण्याचे आश्वासन देखील दिले. यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडून मदत घेत महिलेला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्या महिलेचे समुपदेशन करून मदत देत तिला घरी पाठवले.


लक्षणं दिसत नसली तरीही मास्क घालणं आवश्यक आहे का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -