घरमुंबईचोरी झालेले 16 लाखांचे मोबाईल परत

चोरी झालेले 16 लाखांचे मोबाईल परत

Subscribe

उल्हासनगर, अंबरनाथमधील तक्रारदारांना दिलासा

उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात घडणार्‍या मोबाईल जबरी चोरी व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या दोन मोबाईल चोरी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत जप्त केलेले 165 मोबाईल फोन म्हणजेच सुमारे 16 लाख 61 हजार 237 रूपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पूर्व प्रादेशिक विभाग कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते तक्रारदारांना हे मोबाईल फोन परत करण्यात आले. अंबरनाथ पश्चिमेकडील बिग सिनेमा मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले.

अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या आदेशान्वये पोलीस उपआयुक्त प्रमोद शेवाळे यांचे अधिपत्याखाली असलेल्या अंंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे व उल्हासनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळी मोबाईल चोरी विरोधी पथके गेल्या दोन वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहेत.

- Advertisement -

गेल्या वर्षभरात या दोन्ही पथकांनी मोबाईल चोरी व मोबाईल हरवलेल्या घटनांची उकल करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स.पो.आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 गुन्हे उघडकीस आणून 22 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 22 मोबाईल, 2 मोटरसायकली तसेच प्रॉपटी मिसिंग केसेसमधील 260 मोबाईल फोन असे सुमारे 40 लाख 97 हजार 735 रुपये किंमतीचे 282 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले होते. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी.टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी 5 गुन्हे उघडकीस आणून 8 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 7 मोबाईल फोन प्रॉपटी मिमिंग केसेस मधील 620 मोबाईल फोन असे सुमारे 69 लाख 55 हजार 541 रूपये किंमतीचे 620 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले होते. उल्हासनगर व अंबरनाथ विभागाच्या पथकांनी हस्तगत केलेले 902 मोबाईल फोन सुमारे 1 कोटी 10 लाख 53 हजार 276 रूपये किंमतीच्या मोबाईलपैकी बरेचसे मोबाईल फोन दोन वेळा आयोजित केलेल्या कार्यक्रमात तक्रारदारांना परत करण्यात आले.

नुकताच मोबाईल स्कॉड उल्हासनगर विभागाकडील 99 मोबाईल फोन सुमारे 10 लाख 14 हजार 337 रुपये किंमतीचे मोबाईल तसेच मोबाईल स्कॉड अंबरनाथ विभागाकडील 66 मोबाईल फोन सुमारे 6 लाख 46 हजार 900 रुपये किंमतीचे असे एकूण 165 मोबाईल फोन सुमारे 16 लाख 61 हजार 237 रूपये किंमतीचा मुद्देमाल अप्पर पो.आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला. आपले चोरीला गेलेले मोबाईल व गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारांना परत मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -