घरमुंबईशिक्षण आणि आरोग्य विभागाला मिळणार बळकटीकरण

शिक्षण आणि आरोग्य विभागाला मिळणार बळकटीकरण

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

एशियन डेव्हलपमेंट बँकेने आतापर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे. आता येणार्‍या काळात शिक्षण, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्याने करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाबरोबरच सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागांचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही पवार यांनी बँकेच्या शिष्टमंडळाला केले.

एशियन डेव्हपमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मंत्रालयात पवार यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, वित्त विभागाचे (वित्तीय सुधारणा)प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी पवार म्हणाले की, महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर राज्य शासन भर देत आहे. असे करीत असताना सामाजिक क्षेत्राचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती यावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य आवश्यक आहे. एशियन डेव्हपमेंट बँकेने महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास चांगल्या सुविधा निर्माण होऊ शकतील. एशियन डेव्हलपमेंट बँकेने या दोन्ही क्षेत्राबाबत आपला अभ्यास करुन राज्य शासनास प्रस्ताव सादर करावा असे पवार यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -