घरमुंबईअमृतमहोत्सवी सूर्यनमस्कार प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग

अमृतमहोत्सवी सूर्यनमस्कार प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग

Subscribe

राज्यातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन सूर्यनमस्कार घालावेत, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आले आहे.

देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रचेतना आणि आरोग्याबाबत जागृती करणार्‍या या ऐतिहासिक उपक्रमात देशातील 30 राज्यांतील ३० हजार शाळांमधील 3 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभागी होऊन सूर्यनमस्कार घालावेत, असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आले आहे.

राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सूर्यनमस्कार प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांनी दररोज 13 सूर्यनमस्कार घालायचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून राज्यातील शाळांना आवाहन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांनी घरातच राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. घरातून सूर्यनमस्कार घालता यावे यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करायचे आहे. तसेच पालकांच्या सहकार्यांनेच विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालायचे आहेत, अशा सूचनाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी. सिंह यांनी केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -