घरमुंबईतरूणाच्या ब्रेन ट्यूमरवर यशस्वी उपचार

तरूणाच्या ब्रेन ट्यूमरवर यशस्वी उपचार

Subscribe

२१ वर्षीय तरूणाच्या ब्रेन ट्यूमरवर मुंबईतील हॉस्पीटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुंबईतील २९ वर्षीय तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यास ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आलं आहे. सततच्या डोकेदुखीचं रुपांतर ब्रेन ट्यूमरमध्ये झाल्याने हा मुलगा बेशुद्धावस्थेत असे. तरूणाने डोकेदुखीकडे खूप दिवस दुर्लक्ष केल्याने ही गंभीर स्थिती उद्भवल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन टीमने या तरुणावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. गणेश भोर याला बेशुद्धावस्थेत (जवळजवळ ब्रेन डेड स्थितीतील) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ब्रेन ट्युमरमुळे होणारा अॅक्युट हायड्रोसेफॅलस (या आजारात सेरब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) मेंदूमध्ये तयार होतं.) असल्याचे निदान झालं होतं. त्याच्यावर वेळेवर उपचार आणि शस्त्रक्रिया केली नसती तर या मुलाच्या जीवावर बेतलं असतं.

- Advertisement -

ग्लोबल हॉस्पीटलमध्ये उपचार

गणेश भोर यांना गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास जाणवत होता. २२ मार्चला ते बेशुद्ध झाले आणि त्यांना तात्काळ ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे सीटीस्कॅन केल्यावर मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा झालं असल्याचं त्यांना कळले. यामुळे, मेंदूतील द्रवावर अतिरिक्त दाब निर्माण होतो. या परिस्थितीला ‘अॅक्युट हायड्रेसेफेलस’ म्हणतात. रुग्णाला इनट्युबेट करण्यात आल्यानंतर एमआरआय चाचणी करण्यात आली. या चाचणीत मेंदूच्या केंद्रावर कोलॉइड सिस्ट (पुळीसारखा प्रकार) दिसून आला. त्यावर लगेच उपचार करणे आवश्यक होते. त्यानुसार, त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्ण गणेश भोर यांनी डॉक्टरांनी केलेल्या तात्काळ उपचारांवर समाधान व्यक्त करत आभार व्यक्त केले आहे.

कॅज्युअल्टीमध्ये इमर्जन्सी व्हेन्ट्रिक्युलर टॅप तयार करण्यात आला. त्याने नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफेलसमधील (रक्तवाहिन्यांना जोडणाऱ्या मार्गात निर्माण होणारा अडथळा) सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा निचरा केला. त्यानंतर दाब कमी झाला आणि रुग्ण शुद्धीवर आला. त्याचप्रमाणे सीएसएफच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे अर्बुद (पुळी) मायक्रोसर्जरी करून काढून टाकण्यात आली. या पुळीमुळे दाब वाढत होता. परिणामी सीएसएफ मेंदूतून बाहेर जाऊ शकत नव्हते. ते मेंदूतच राहिल्याने मेंदूतील दाब वाढला आणि तो बेशुद्ध झाला. पण, काही दिवसांनी त्याला बरं वाटलं आणि चौथ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
डॉ. नितीन डांगे, न्यूरोसर्जन, ग्लोबल हॉस्पिटल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -