घरमुंबईभिवंडीतील ४ स्वीकृत नगरसेवकांचे निलंबन रद्द; मुख्यमंत्र्यांना हायकोर्टाचा दणका

भिवंडीतील ४ स्वीकृत नगरसेवकांचे निलंबन रद्द; मुख्यमंत्र्यांना हायकोर्टाचा दणका

Subscribe

भिवंडी शहर महानगरपालिकेतील काँग्रेसचे ३ आणि शिवसेनेचा १ असे ४ स्वीकृत नगरसेवकांचे निलंबन मुंबई हायकोर्टाने रद्द केले.

भिवंडी शहर महानगरपालिकातील काँग्रेसचे सिध्देश्वर कामूर्ती, साजिद खान, राहुल खटके आणि शिवसेनेचे देवानंद थळे यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द करण्यासाठी २२ जुलै २०१८ रोजी भाजप आमदार महेश चौघुले यांनी मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार  केली असता त्यांनी तत्काळ चारही स्वीकृत नागरसिकांचे पद निलंबन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या नगरसेवकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असता आज, मंगळवारी हायकोर्टाने मुख्यमंत्र्यांचा आदेश रद्द करून चारही स्वीकृत नगरसेवकांना पुन्हा पद बहाल केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -