घरमुंबईताडदेव इमारत आग दुर्घटनेवेळी आग प्रतिबंधक यंत्रणा फेल, तर फायर अलार्म सिस्टीमही...

ताडदेव इमारत आग दुर्घटनेवेळी आग प्रतिबंधक यंत्रणा फेल, तर फायर अलार्म सिस्टीमही होती बंद; अग्निशमन दलाचा अहवाल

Subscribe

इमारतीमधील आग प्रतिबंधक यंत्रणा बंद स्थितीत आढळली, आग लागल्यावर फायर अलार्मही वाजला नाही

ताडदेव येथे २२ जानेवारी रोजी ‘सचिनम हाइटस’ या २० मजली इमारतीला २२ जानेवारी रोजी आग लागून ९ जणांचा बळी दुर्दैवी बळी गेला. या आगीच्या सखोल चौकशीचा अहवाल एका महिन्यानंतर अग्निशमन दलाने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, सदर इमारतीमधील आग प्रतिबंधक यंत्रणा, फायर अलार्म सिस्टीमही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आग का लागली, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे, या इमारतीच्या विकासकाने इमारत पूर्णत्वाचा दाखला पालिकेकडे सादर केला नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे.

त्यामुळे आता या अहवालावर पालिका आयुक्त, महापौर, सर्व पक्षीय गटनेते हे कोणती भूमिका घेणार, याप्रकरणी कोणती कारवाई करणार हे पुढील आठवड्याभरात स्पष्ट होणार आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास ताडदेव येथील ‘सचिनम हाइटस’ या २० मजली इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ९ जणाचा होरपळून मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले होते. तसेच, इमारतीची मोठी वित्तीय हानीही झाली.

- Advertisement -

या आगीच्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद पालिका मुख्यालयात उमटले होते. सर्व पक्षीय गटनेते, नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला होता. त्यानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, या आगीची सखोल चौकशी करण्यासाठी एका समितीची घोषणा केली होती. या समितीने एका महिन्यात सखोल चौकशी करून आपला अहवाल हा पालिका आयुक्तांना सादर केला.

सदर इमारतीमध्ये नेमकी आग का व कशी काय लागली, याचे कारण सदर अहवालात स्पष्ट केलेले नाही. मात्र इमारतीच्या जिन्यांवर मोकळ्या जागेत चपलांसाठी रॅक ठेवला होता. तसेच, रूमला लाकडी दरवाजे होते. वायरिंग, ज्वलनशील साहित्य यामुळेही आग भडकल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अग्निशमन दलाने, आगीप्रसंगी सदर इमारतीमधील आग प्रतिबंधक यंत्रणा फेल झाल्याचे आणि फायर अलार्म बंद होते, अशी कारणे दिली आहेत.

- Advertisement -

अग्निशमन दलाने सदर इमारतीमधील त्रुटींबाबत ८ जानेवारी २०१८ रोजी ‘त्या’ इमारतीमधील सोसायटीला अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचे एका नोटिशीद्वारे फर्मावले होते. मात्र त्याकडे सोसायटीकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे अग्निशमन दलाने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच, इमारतीमधील खोल्यांचे मुख्य दरवाजे हे अग्निप्रतिबंध असतो. मात्र अनेक सदनिका धारकांनी फेरफार करताना हे दरवाजे बदलल्याने आग भडकल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. तसेच,इमारतीमधील खोल्यांमध्ये अनेक फेरफार झाल्याचे म्हटले आहे.

खालील बाबींवर चौकशी समितीची निरीक्षणे

1) अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबतचा अहवाल वर्षातून दोन वेळा सादर करणे अपेक्षित असताना तसे करण्यात आले नाही.

2)  काही मजल्यांवर २ ते ३ खोल्यांचे एकत्रीकरण करून मूळ भिंती काढून टाकण्यात आल्याचे आढळून आले.

3) आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

4)  प्रत्येक मजल्यावर आवश्यक ओपनिंग स्पेस नव्हती.

5) सार्वजनिक स्पेसेसमध्ये अतिक्रमण झाल्याचे आढळून आले.

6)  इमारतीचे फायर ऑडिट व तातडीची उपाययोजना करून अहवाल सादर करण्याचे अहवालात म्हटले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -