घरमुंबईतेजश्री वैद्यची प्रकृती स्थिर, एका महिन्यानंतर व्हेंटिलेटर काढले

तेजश्री वैद्यची प्रकृती स्थिर, एका महिन्यानंतर व्हेंटिलेटर काढले

Subscribe

सव्वा महिन्यांपूर्वी सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून जखमी झालेल्या तेजश्री वैद्यचे एका महिन्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. त्यामुळे सध्या ती नैसर्गिक श्वास घेत आहे. तिच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत.

तेजस्वीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा 

- Advertisement -

२३ वर्षांच्या तेजश्रीने एका महिन्यानंतर डोळे उघडले. तिचा उजवा डोळा पूर्णपणे उघडला आहे. तर, डाव्या बाजूच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी झाल्याने ती डावा डोळा पूर्ण उघडू शकत नाही. तर २ दिवसांपासून तिने हाताची बोटे देखील हलवायला सुरुवात केली आहे. डोळ्यांचे डॉक्टर्स, न्यूरॉलॉजिस्ट आणि डायटिशियन यांच्या निरीक्षणाखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमके काय घडले ?

- Advertisement -

१९ एप्रिलला परीक्षेला निघालेल्या तेजश्रीचा ट्रेनमधून जात असताना अचानक तोल गेला आणि ती नाल्यात पडली. नाल्यातील सर्व घाण पाणी तेजश्रीच्या नाका – तोंडात गेले. ती तब्बल एक तास अशीच नाल्यात पडून होती. त्यामुळे तिची प्रकृती आणखी खालावली. तिच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आतापर्यंत तेजश्रीवर एकही शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. तिला देण्यात येणाऱ्या औषंधामुळे तिच्या त्या गाठी वितळू शकतील, असे तिचा भाऊ संकेत वैद्य याने सांगितले आहे.

आतापर्यंत 80 हजार रूपयांचा खर्च

तेजश्रीच्या आतापर्यंतच्या उपचारांवर ८० हजार रुपये खर्च झाले आहेत. तर दिवसाला गोळ्यांचा खर्च कमीतकमी १२०० रुपये येतो, असे तिचे वडील श्रीराम वैद्य यांनी सांगितले आहे. तर तेजश्रीला थोडीफार मदत व्हावी म्हणून अनेकजणांनी फोन केल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले आहे. पण या सर्व प्रकरणात रेल्वेने एकदाही विचारपूस केली नसल्याची खंत तिच्या वडिलांनी बोलून दाखवली.

तेजस्वीची प्रकृती स्थिर

तेजस्वची प्रकृती स्थिर आहे. पण, ती पूर्णपणे शुद्धीवर नाही. तिच्यावर उपचार सुरू आहेत. हळहळू ती बरी होईल. मेंदूत गाठी असल्याकारणाने ती पूर्णपणे कधी ठीक होईल हे सांगता येणार नाही अशी माहिती शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -