घरमुंबईतारापूरच्या तारा नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट

तारापूरच्या तारा नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट

Subscribe

मालकासह १० कामगारांचा मृत्यू,मृतांचा आकडा ३० वर जाण्याची शक्यता 

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील तारा नायट्रेट या कंपनीत शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये कंपनीच्या मालकासह १० कामगारांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाला त्यावेळी ८० कामगार कंपनीत होते. स्फोटाची भीषणता लक्षात घेता ३० कामगारांनी जीव गमावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली आहे. या कंपनीतील स्फोटानंतर लगतच्या काही कारखान्यांचेही नुकसान झाले आहे.

तारापूर औधोगिक वसाहतीत कोलवडे या गावात असलेल्या तारा नायट्रेट कंपनीतील नव्या इमारतीत असलेल्या बॉयलर रिअ‍ॅक्टरची चाचणी सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या कंपनीमध्ये अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येते. या स्फोटाचा आवाज 25 ते 30 किलोमीटर अंतरापर्यंत डहाणू आणि पालघरपर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना सुरुवातीला पालघर भागात भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

स्फोटामुळे कंपनीची इमारतही कोसळली. स्फोटात मालक नटुभाई पटेल हेही ठार झाले. रात्री ९ वाजेपर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले. कंपनीची दुसरी पाळी सुरू होती. त्यामुळे आतमध्ये 80 कामगार काम करीत होते. नेमका त्याचवेळी हा स्फोट झाल्याने मोठी प्राणहानी झाली असण्याची शक्यता आहे. कंपनीचा रखवालदार आपली पत्नी आणि दोन मुलांसह कंपनीच्या आवारात असलेल्या घरात रहात होता. स्फोटात ते घर कोसळल्याने चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. पण, तीसहून अधिक कामगार मृत्युमुखी पडले असावेत असे सांगण्यात येते. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या मदत कार्यात करीत आहेत. तर मृत आणि जखमींच्या हलवण्यासाठी बारा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

तारा नायट्रेट कंपनीच्या स्फोटाच्या झळा शेजारी असलेल्या गॅलेक्सी, विकास केमिकल या दोन कंपन्यांना बसला. या तिन्ही कंपन्यांमध्ये आग लागली आहे. तसेच या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले.

- Advertisement -

या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकलेली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या आवारामध्ये किमान आठ कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -