घरदेश-विदेशPulwama Attack : अवघ्या २२ व्यावर्षी मानवी बाँब बनण्याचं धाडस आलं कुठून?

Pulwama Attack : अवघ्या २२ व्यावर्षी मानवी बाँब बनण्याचं धाडस आलं कुठून?

Subscribe

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आदिल अहमद याला दहशतवादी संघटेमध्ये 'आदिल अहमद गाडी टकरानेवाला' या नावाने ओळखले जात होते.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार- दशतवादी ‘अदील अहमद’ याचं नाव सध्या सगळीकडेच चर्चिलं जात आहे. भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये हा २२ वर्षीय तरुण ‘सुसाईड बॉम्बर’ म्हणून सहभागी झाला होता. आदिल अहमद याने स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी जवानांच्या वाहनावर आदळवली. यामध्ये सुमारे ४४ जवानांसोबत अहमदही जागीच ठार झाला. एकीकडे अदिल अहमदच्या या कृत्याविषयी त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. तर, दुसरीकडे अवघ्या २२ वर्षांचा हा दहशतवादी कुठून आला होता? त्याची पार्श्वभूमी काय होती? याविषयीची माहितीदेखील समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अदिल हा काश्मीर खोऱ्यातील रहिवासाी असून ज्याठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणापासून अवघ्या ५ किलोमीटरवर त्याचे घर आहे.

आदिल ‘तो’ व्हिडिओ चक्रावून सोडणारा

२२ वर्षीय दहशतवाही आदिल दक्षिण काश्मीरमधील गुंडिबाग गावाचा रहिवासी होता. २ वर्षांपूर्वी त्याने मध्यातूनच शिक्षण सोडले होते. दोन वर्षांपूर्वीच तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटेमध्ये सामील झाला होता. जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तान स्थित संघटना असून, काल झालेल्या हल्ल्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. दरम्यान, पुलवामा येथे जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यापूर्वी आदिलने शूट केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो आहे की, ‘मागील १ वर्षापासून त्या हल्ल्याची तयारी सुरु होती. याशिवाय तो काश्मीरी मुस्लिमांच्या प्रश्नांविषयीही बोलला आहे. हा व्हिडिओ शूट करतेवेळी आदिलच्या हातात एक रायफल आणि त्याच्यापाठीमागे ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचा बॅनर असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

‘ही’ होती आदिलची ओळख

दहशतवादी संघटनेचा सदस्य बनल्यानंतर आदिलला ‘आदिल अहमद गाडी टकरानेवाला’ आणि ‘गुंडिबागचा वकास कमांडो’ म्हणून ओळखलं जात होतं. बहुधा आदिलला देण्यात आलेल्या या हल्ल्याच्या मिशनवरुनच त्यांच ‘गाडी टकरानेवाला’ हे नाव पडलं असावं. दरम्यान, वर्षभरापासून सुरु असलेल्या नियोजनानुसार काल (गुरुवारी) आदिलने जम्मूवरून श्रीनगरला जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळत हल्ला केला. ज्यामध्ये ४० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -