घरमुंबईठाण्यातील हल्लेखोराला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

ठाण्यातील हल्लेखोराला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनींची हत्या करणारा हल्लेखोर आकाश पवार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनींची हत्या करणारा हल्लेखोर आकाश पवार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दीड महिन्यापूर्वी आकाशने तिला दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. प्राचीला अजिबात त्रास देणार नाही अशी सर्वांसमोर त्याने कबुली दिली होती. पण राग त्याच्या मनात होता. आणि तो हिंसक बनला.

ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये बीकॉमच्या दुसर्‍या वर्षात शिकणारी प्राची शनिवारी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या ऍक्टिव्ह गाडीवरून ठाण्यातच नोकरीवर जात असतानाच, आकाश हा तिच्या मागावर होता. आरटीओ कार्यालयाजवळील रस्त्यावर त्याने तिची गाडी अडवून आपल्याकडील धारदार चाकूने तिच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून हत्या केली होती. अवघ्या काही तासातच पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतले होते. प्राचीच्या हत्या केल्यानंतर आकाशने बस खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चालकाने ब्रेक लावल्याने तो बचावला त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आकाश हा भिवंडी येथील काल्हेर गावात राहतो. कॉलेज सोडल्यानंतर तो पीओपीची कॉन्ट्रॅक्ट घेतो. ठाण्यातील व्यावसायिक शामसुंदर व प्रवीण खन्ना या दोघा बंधूची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या प्रकरणात प्राचीच्या वडील यांचा समावेश होता. त्यामुळे प्राचीच्या हत्येशी पूर्व वैमनस्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचे उघड झाले होते. विकास झाडे यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी प्रिया एम. कॉम करीत असून, वागळे इस्टेट येथील एच डी एफ सी बँकेत नोकरीला आहे. तर प्राची बी.कॉम.च्या दुसर्‍या वर्षात शिकत होती. ती कॉलेज करून ठाण्यातच शादी डॉट कॉम या कार्यालयात अर्धवेळ नोकरी करीत होती. प्राचीच्या हत्याने कोपरी परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

एकतर्फी प्रेम ही मालकीचीच भावना …
एकतर्फी प्रेम ही तरुणांच्या मनात मालकीची भावना असते. नकार आला की त्यांच्या संतापाचा उद्रेक होतो. आणि ते हिंसक बनतात. लहानपणापासून नकार ऐकण्याची सवय नसते. अनेक गोष्टीत मुबलकता असते त्यामुळे असे प्रकार घडतात.

-अद्वेत पाध्ये, मानसोपचार तज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -