घरमुंबईयंदाची ठाणे मॅरेथॉन खड्ड्यातून होणार

यंदाची ठाणे मॅरेथॉन खड्ड्यातून होणार

Subscribe

ठाणे महापौर मॅरेथॉनला डावलल्याने आता महापौर विरुध्द आयुक्त असा नवा वाद पेटण्याची शक्यता ठाणेकर व्यक्त करत आहेत. आयुक्तांनी महापौर स्पर्धेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे ठाण्याच्या वर्तुळात बोलले जात आहे.

पावसाळ्यामध्ये खड्डे हा नेहमी चर्चेचा विषय बनत असतो. ठाण्यामध्ये देखील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. येत्या २ सप्टेंबरची ठाणे मॅरेथॉन खड्ड्यातूनच होणार आहे. ठाण्यातील खड्डे बुझवण्यासाठी १० सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे.

खड्डे बुझवण्याचे काम महिनाभरापासून सुरु

ठाण्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्याचे काम १६ जुलैपासून सुरु आहे. ते बुझवण्यासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळे आदेश दिले जातात. मात्र रस्त्यांवरील खड्डे आहे तसेच पाहायला मिळतात. काही ठिकाणी पेव्हरब्लॉकचा मुलामा देण्यात आला. मात्र मोठ्या वाहनांमुळे ते उखडून बाहेर फेकले गेले आहेत.

- Advertisement -

ठाणे महापौर मॅरेथॉन खड्ड्यातूनच

येणाऱ्या १० सप्टेंबरपर्यंत गणपतीचे आगमन आणि विसर्जन ज्या रस्त्यांवरु होते ते खड्डेमुक्त करा असे आदेश ठाणे आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे २ सप्टेंबरला होणारी २९वी महापौर मॅरेथॉन स्पर्धे खड्ड्यातून होणार का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महापौर मॅरेथॉनला डावलल्याने आता महापौर विरुध्द आयुक्त असा नवा वाद पेटण्याची शक्यता ठाणेकर व्यक्त करत आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या सुचनेबद्दल मला माहीती नाही. पण ठाणे मॅरेथॉनसाठी आम्ही सज्ज आहोत. याबाबत पाहणी करून लवकरच खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्यात येतील. ठाणे मॅरेथॉन यशस्वीरित्या संपन्न होणार त्यामध्ये कोणतीही बाधा राहणार नाही – मिनाक्षी शिंदे. महापौर, ठाणे महानगर पालिका

महापौर मॅरेथॉनला आयुक्तांकडून दुय्यम स्थान

यंदाच्या ठाणे मॅरेथॉनमध्ये या वर्षी ‘मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेवून सुमारे २० हजार स्पर्धक धावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये विदेशातील पाहुणे मंडळीही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. मात्र आयुक्तांनी या स्पर्धेला दुय्यम स्थान देऊन मागील १६ जुलैपासून प्रलंबित असलेला खड्ड्यांचा प्रश्न अजून १० सप्टेंबर तारखेपर्यंत लांबणीवर टाकला आहे. आयुक्तांनी महापौर स्पर्धेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे ठाण्याच्या वर्तुळात बोलले जात आहे.

- Advertisement -

आयुक्तांच्या आदेशनंतरही ठाणे खड्डेमुक्त नाही

७ ऑगस्ट रोजी ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचे उद्घाटन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात खड्ड्यासंबंधी बैठक सुरु होती. ज्यामध्ये त्यांनी सर्व संबंधित विभागाला खड्ड्यांची पाहणी करून ते बुजवण्याचे आदेश दिले होते. मागील दोन महिन्यापासून ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनी खड्ड्यांच्या प्रश्नांवर दिलेले विविध आदेश दिले. तरी ठाणे खड्डेमुक्त झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -