घरमुंबईसात वर्षांपूर्वीच आरोपीचा मृत्यू; २७ वर्षानंतर गुन्ह्याचा उलगडा

सात वर्षांपूर्वीच आरोपीचा मृत्यू; २७ वर्षानंतर गुन्ह्याचा उलगडा

Subscribe

कल्याण महात्मा फुले चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची हत्या झालेल्याची घटना २७ वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, या घटनेच्या आरोपीचा ७ वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

एखाद्या गुन्ह्याचा उलगडा होत असताना अनेक वर्ष निघून जातात आणि त्यानंतर त्या आरोपीला शिक्षा केली जाते. मात्र, अशी एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये सात वर्षांपूर्वीच आरोपीचा मृत्यू झाला असून २७ वर्षानंतर हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असल्याची घटना ठाणे येथे घडली आहे.

नेमके काय घडले?

ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकातील आणि कल्याण महात्मा फुले चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची २३ जुलै १९९२ रोजी हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा आरोपी इकबाल उर्फ नन्हें खान यांनी हत्या करुन पोबारा केला होता. मात्र, तब्बल २७ वर्षानंतर या हत्येच्या गुन्हाचा उलगडला करण्यात आला आहे. मात्र, हत्या करणाऱ्या आरोपीचा सात वर्षांपूर्वीच मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले. यामुळे गुन्हा उघडकीस आला पण आरोपीने जगाचा कायमचा निरोप घेतल्याने हत्या करणाऱ्याला शिक्षाच झाली नाही. पण केसमात्र निकाली निघाली आहे.

- Advertisement -

मृत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सिंह पाटील हे कल्याण महात्मा फुले चौकात कार्यरत असताना अर्पी नन्हें खान याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात पाटील यांचा मृत्यू झाला. आरोपी नन्हें हा फरारी होऊन अज्ञातस्थळी भूमिगत झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपी सापडलाच नाही. पोलिसांनी त्वरित आरोपी नन्हें खान याच्यावर दरोडा आणि अन्य प्रकरणे दाखल केली. या प्रकरणाचा शोध आणि मागोवा गुन्हे शाखा युनिट १ चे पथक कारीत होते. दरम्यान, पथकाला आरोपी नन्हें खान याच्या शेवटच्या वास्तव्याचा सुगावा लागला आहे. खान हा दिल्लीतील ओखला क्षेत्रात जसोला गावात खानच्या शोधात पोहचल्यानंतर पोलीस पथकाला माहिती मिळाली कि, आरोपही नन्हें खान हा आजारी पडून सात वर्षांपूर्वीच मरण पावल्याचे समजले. खुनाचा गुन्ह्याचा उलगडा केल्यानंतरही गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. केस निकाली निघाली पण आरोपीला अटक मात्र झाली नाही.


हेही वाचा – नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपीची हत्या; बहिणीच्या आत्महत्येचा घेतला बदला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -