घरमुंबईसोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बोनस

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बोनस

Subscribe

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या ताडदेव पेालिसांना संबंधित आरोपीसह त्याच्या रेकॉर्डवरील भावावरही कारवाई करण्यात यश आले आहे.

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या ताडदेव पेालिसांना संबंधित आरोपीसह त्याच्या रेकॉर्डवरील भावावरही कारवाई करण्यात यश आले आहे. बंगलोर येथे पोलिसांनी कारवाई करुन या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले आहे. अब्बास आदिल भोरानिया आणि अखिल आदिल भोरानिया अशी या दोघांची नावे आहेत. यातील अब्बासला ताडदेव पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली तर अखिलला पुढील चौकशीसाठी खेरवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

आरोपीसह त्याच्या भावावरही बंगलोर येथे कारवाई

ताडदेव परिसरात काही दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या एका गुन्ह्यांची नोंद झाली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. यावेळी फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यात अब्बास भोरानिया याचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र, डोंगरी येथे राहणारा अब्बास हा या गुन्ह्यानंतर पळून गेला होता. तो बंगलोर येथे पळून गेल्याची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांचे एक विशेष पथक बंगलोर येथे रवाना झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन माने, उपनिरीक्षक जगताप, पोलीस हवालदार सांगले, गोडसे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बंगलोर येथून अब्बास याला शिताफीने अटक केली. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याचा मोठा भाऊ अखिल हादेखील पोलिसांना सापडला. या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता अब्बासने ताडदेव येथे सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली तर त्याचा भाऊ अखिल अशाच गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध खेरवाडी पोलीस ठाण्यात सहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असून या सहाही गुन्ह्यांत तो पाहिला आरोपी आहे. तसेच डोंगरीसह काशिमिरा, नवघर, काळाचौकी, मिरारोड पोलीस ठाण्यातील काही गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले होते. या वॉरंटनंतर अखिल हा मुंबई सोडून पळून गेला होता. काही महिन्यांपासून तो बंगलोर शहरात वास्तव्यास होता. त्याला भेटण्यासाठी अब्बास हा देखील तिथे गेला. मात्र, त्याच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना अब्बाससोबत अखिल हा देखील सापडला. त्यामुळे या दोघांनाही नंतर मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. अखिलचा ताबा खेरवाडी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. तर अब्बासला सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पीएमसी बँक घोटाळा : भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला पोलीस कोठडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -