घरमुंबईबेस्टवर शिवसेना सूड उगवणार, तुटीचा अर्थसंकल्प परत पाठवणार!

बेस्टवर शिवसेना सूड उगवणार, तुटीचा अर्थसंकल्प परत पाठवणार!

Subscribe

बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या संपामध्ये महापालिका आणि राज्य सरकारने बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन न्यायालयात दिले. त्यामुळे या आश्वासनानुसार बेस्टला आर्थिक मदत जाहीर करून तुटीचा अर्थसंकल्प शिलकीत दाखवता येणार आहे.

बेस्टचा तब्बल ७६९ तुटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करून महापालिका सभागृहात मांडण्यात आला. मात्र, महापालिका सभागृहात मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प तुटीचा असल्याने पुन्हा बेस्टकडे पाठवण्यात येणार आहे. बेस्ट संपात शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. याचा सूड उगवण्यासाठीच बेस्ट आर्थिक तोट्यात असलेल्या उपक्रमाला मदत करण्याऐवजी अर्थसंकल्प उपक्रमाकडे परत पाठवून देण्याची रणनिती सत्ताधारी पक्षाने आखली आहे.

प्रस्ताव उपक्रमाकडे परत पाठवणार

बेस्ट उपक्रमाने २०१९-२०चा ६ हजार १२४ कोटींचा अर्थसंकल्प समितीत मांडल्यानंतर ७२० कोटी रुपयांच्या तुटीचा या अर्थसंकल्पाला मंजुरी देवून स्थायी समितीत मांडण्यात आला. स्थायी समितीतही याला मंजूरी दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सभागृहात मांडला. मागील दोन सभेपूर्वी यावर अध्यक्षांनी भाषण करत विचार मांडले होते. परंतु शुक्रवारी होणार्‍या महापालिका सभागृहात अर्थसंकल्पाचा प्रस्ताव उपक्रमाकडे परत पाठवण्याचा निर्धार केला आहे.

- Advertisement -

बेस्ट कामगारांचा ९ दिवस संप

तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ९ दिवस संप पुकारला होता. मात्र, बेस्टच्या परिवहन विभागाला नफ्यात आणण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकार यांनी आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. कामगारांनी पुकारलेल्या संपामध्ये महापालिका आणि राज्य सरकारने बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन न्यायालयात दिले. त्यामुळे या आश्वासनानुसार बेस्टला आर्थिक मदत जाहीर करून तुटीचा अर्थसंकल्प शिलकीत दाखवता येणार आहे. परंतु, सत्ताधारी पक्षाने प्रशासनाकडून कोणतीही रक्कम बेस्टकडे वळती न करण्याचा निर्धार करत तुटीचा अर्थसंकल्प पुन्हा उपक्रमाकडेच पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मात्र, याचा तीव्र निषेध केला आहे. बेस्ट कामगारांनी पुकारलेल्या संपानंतर महापालिका बेस्टला काय मदत करणार आहे, हे जाहीर व्हायला हवे. बेस्टला महापालिकेने मदत करायला हवी. परंतु बेस्टला मदत न करता हा अर्थसंकल्प जर तुटीचा असल्याने परत पाठवला जात असेल तर अयोग्य आहे. संपानंतर बेस्टला जर मदत केली तरीही अर्थसंकल्प शिलकीचा होवू शकतो. त्यामुळे शिलकीचा अर्थसंकल्प परत पाठवण्याची गरजच नाही. परंतु बेस्ट संपामध्ये शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सर्वांनीच केल्यामुळे याचा सूड उगवण्यासाठी हा अर्थसंकल्प परत पाठवण्याचा त्यांचा डाव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

संप यशस्वी झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -