घरमुंबई'द बर्निंग ओला...' थोडक्यात बचावले चिखलकर कुटुंबीय!

‘द बर्निंग ओला…’ थोडक्यात बचावले चिखलकर कुटुंबीय!

Subscribe

मानपाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमुळे ओला-उबेरने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मानपाडा मार्गावर शुक्रवारी अचानक धावत्या ओला गाडीला आग लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चिखलकर कुटूबीयांचा जीव थोडक्यात बचावला आहे. मात्र या घटनेमुळे ओलाची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मानपाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमुळे ओला-उबेरने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशी घडली घटना 

मानपाड्याच्या हॅपी गल्लीमध्ये राहणारे शैलेंद्र चिखलकर हे आपल्या आईची ८०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ठाण्याच्या पाचपाखाडी मधील एका हॉटेलमध्ये गेले होते. रात्री आईचा वाढदिवस साजरा करुन सुमारे रात्री १ वाजता हॉटेलमधून घरी जाण्यासाठी ऑनलाईन ओला बुक केली होती. तेव्हा शैलेंद्र त्यांची मुलगा व मुलगी आणि आई या एमएच. ०१ सी आर १६२५ या ओलाच्या गाडीतून प्रवास करत होते. मानपाडापर्यंत ते व्यवस्थित आले. मात्र काही अंतरावर अचानक ओलाच्या गाडीने पेट घेतली. पण ओला चालक आणि आत बसलेल्या शैलेंद्रच्या कुटुंबीयांना या आगीची कल्पना नव्हती. यावेळी रस्त्यावरून जाणार्‍या वाहन चालकांना ही आग आणि धूळ दिसताच लगेच हॉर्न वाजवून यांची माहिती ओलाच्या वाहक अक्कबर खान याला दिली. चालकाने लगेच एमर्जन्सी ब्रेक मारून गाडी थांबविली. मात्र त्यावेळी गाडीच्या खिडक्या पूर्ण बंद होत्या. एसीमधून मोठ्या प्रमाणात गाडीत धूर जात होता. त्यामुळे गाडीत असलेल्या ओला चालकासह शैलेंद्रच्या कुटुंबीयांचा जीव गुदमरू लागला. गाडी थांबताच रस्त्यावरील नागरिकांनी गाडीकडे धाव घेतली. वाहकाने खिडक्या काच ऑपन करून दार उघडले. शैलेंद्रच्या कुटूंबियांना नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर त्यांना गाडीपासून लांब घेऊन गेले. मात्र शैलेंद्र गाडीत अडकून पडला होता. कारण सिट बेल्ट निघत नव्हता. मात्र वाहक अक्कबर यांनी बटनला झटका देऊन सीट बेल्ट लॉक ओपन केले. अशाप्रकारे शैलेंद्रचासुद्धा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत ओला कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पाहा, २० वर्षांपूर्वी कशा दिसत होत्या? ‘या’ तीन भारतीय सौंदर्यवती

ओला-उबेरचा प्रवास धोकादायक

ओला-उबेरच्या गाड्यांची देखभाल नियमीत होत नसल्यामुळे गाड्यांना आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गाडी डिझेलची असल्यामुळे आग पेट घेत होती. पण सीएनजी गॅसवर धावणारी ही गाडी असती तर जागीच मोठा स्फोट झाला असता. त्यामुळे मोठी जिवीतहानी झाली असती. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा लक्षता घेत कंपनीने याकडे लक्ष द्यावे. सोबतच प्रवासातील सुरक्षेमध्ये सुद्धा काही बदल होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया दैनिक आपलं महानगरशी बोलताना शैलेंद्र चिखलकर यांनी दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -