घरमनोरंजनपाहा, २० वर्षांपूर्वी कशा दिसत होत्या? 'या' तीन भारतीय सौंदर्यवती

पाहा, २० वर्षांपूर्वी कशा दिसत होत्या? ‘या’ तीन भारतीय सौंदर्यवती

Subscribe

लारा दत्ता, दिया मिर्झा आणि प्रियांका चोप्रा या तिघी सौंदर्यवतींनी विविध सौंदर्यवती स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करुन भारताला सौंदर्याचा ताज मिळवून दिला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ता हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन २० वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत लारा दत्तासोबत आपल्याला बॉलीवूडच्या अभिनेत्री दिया मिर्झा आणि प्रियांका चोप्रा दिसत आहेत. लारा दत्ता, दिया मिर्झा आणि प्रियांका चोप्रा या तिघी सौंदर्यवतींनी विविध सौंदर्यवती स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करुन भारताला सौंदर्याचा ताज मिळवून दिला आहे.

- Advertisement -

अभिनेत्री लारा दत्ता हिने शेअर केलेला फोटो हा एक कोलाज फोटो आहे. या फोटोमध्ये लाराने तिघींचेही २० वर्षांपूर्वीच्या एका फोटोसह सध्याचेही फोटो कोलाज केले आहेत. हा फोटो लारा दत्ताने दिया मिर्झा आणि प्रियांका चोप्रासोबत शेअर केला आहे.

8be568b029eab359e9014aebe4d04008

- Advertisement -

प्रियांकाने या फोटोला सुंदर रिप्लाय दिला आहे. ती म्हणते की, “अहो आश्चर्य! मी हा फोटो खूप आवडला. तुम्ही दोघीही या फोटोत खूप सुंदर दिसत आहात. तेव्हाही मी तुम्हा दोघींची प्रशंसा केली होती. आताही करते.” दिया मिर्झानेसुद्धा खूप खूप प्रेम म्हणत फोटो आवडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. २००० मध्ये लारा दत्ताने मिस युनिव्हर्स किताब पटकावला होता. दिया मिर्झाने मिस एशिया पॅसिफिक आणि प्रियांकाने मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे.

hqdefault

307kjh9g_priyanka-chopra-instagram_625x300_19_July_18

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -