घरमुंबईनरिमन पॉईंट येथील फुटपाथवर जोडप्याची आत्महत्या, मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही

नरिमन पॉईंट येथील फुटपाथवर जोडप्याची आत्महत्या, मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही

Subscribe

नरिमन पॉंईंट येथील मफतलाल बाथ येथील फुटपाथवर एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह पडला असल्याचे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्याच्या लक्षात आले.

नरिमन पॉईंट येथील फुटपाथवर शुक्रवारी पहाटे एका जोडप्याचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून दोन्ही मृतदेह पूर्वतपासणीसाठी जीटी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहेत. या दोघांनी किटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असल्याची शक्यता प्राथमिक तपासावरून समोर येत आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नरिमन पॉंईंट येथील मफतलाल बाथ येथील फुटपाथवर एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह पडला असल्याचे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्याच्या लक्षात आले. याची माहिती मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी मरीन ड्राइव्ह पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पूर्व तपासणीसाठी जीटी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. पोलिसांना मृतदेहाजवळ काहीही मिळून आलेले नसल्यामुळे दोन्ही मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. हे मृतदेह पुरुष आणि महिलेचा असून पुरुषाचे वय अंदाजे ४५ ते ५० असून महिलेचे वय ३५ असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासावरून या दोघांनी किटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. दोन्ही मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी मुंबई तसेच मुंबई बाहेरील हरवल्याची माहिती मागवण्यात आली आहे, तसेच प्र्त्येक पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -