घरमुंबईजम्मू काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे त्रिभाजन

जम्मू काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे त्रिभाजन

Subscribe

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपात आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी उडी मारली आहे. गेल्या महिनाभर अधिक कालावधीसाठी महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य उघड्या डोळ्यांनी बघत आहे. या नाट्यामागच राजकीय षड्यंत्र मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही, किंबहुना ते लक्षात येवू नये म्हणून रोज घडीला प्रादेशीक राजकीय तसेच भावनात्मक चर्चा विवाद सर्वत्र चालविला जात असून जम्मू काश्मीरच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे त्रिभाजन करण्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

यावेळी महाशिवआघाडी लक्ष्य करताना , मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करून उरलेल्या महाराष्ट्रातून विदर्भ सुद्धा वेगळा करण्याची चिन्हे नजरेआड करता येणार नाहीत. तर ज्या प्रमाणे घटनेचे अनुच्छेद 370 वापरायचे होते म्हणून जम्मू काश्मीरची विधानसभा युती तोडून डळमळीत केली व जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

तर घटनेच्या अनुच्छेद 370 प्रमाणे राज्यांचे विभाजन करण्या करता राज्यातील जनमताचा कौल आवश्यक असतो असा कौल पक्षीय विधानसभा अस्तित्वात असण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांच्या माध्यमातून घडवून आणणे सोपे असते.तर ज्याअर्थी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली त्यावरून उपरोक्त विभाजनाचा संशय येण्यास प्रबळ कारण उपलब्ध आहे. त्याशिवाय खालील काही मुद्दे गतकालीन इतिहास बघता कुठल्याही सुज्ञ नागरिकास नाकारता येणार नाहीत, असे स्पष्ट करताना मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून काही बलाढ्य पुंजीपती व भांडवलदार यांच्या ताब्यात द्यावयाची आहे, असा घणाघाती आरोप ही त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -