घरमनोरंजनप्रभास च्या 'सलार' ची हिंदी आवृत्ती १०० कोटी पार करून वर्ष...

प्रभास च्या ‘सलार’ ची हिंदी आवृत्ती १०० कोटी पार करून वर्ष अखेरीस बॉक्स ऑफिसवर विक्रमी नोंद करण्यासाठी सुसज्ज !

Subscribe





प्रभास अभिनीत ‘सलार’ ची जादू कमालीची चालली असून, गेल्या ८ दिवसांत भरघोस कमाई करण्याचा विक्रम सलार ने केला आहे. वर्ष अखेरच्या सेलिब्रेशन निमित्त या चित्रपटाची कमाई वाढणार याची शाश्वती होतीच. पण त्या आधीच या चित्रपटाने धमाका केला आहे !
मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या प्रभासच्या सलार ने चित्रपट रसिकांना मारधाड मनोरंजनाचा जबरदस्त डोस दिला आहे . परिणामी अगदी पहिल्याच दिवसापासून सर्वात मोठी ओपनिंग घेणाऱ्या या चित्रपटाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्रदर्शित झाल्यावर दुसऱ्या शुक्रवारीही हा चित्रपट भरघोस कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.
सलार चं नेट इंडिया कलेक्शन तर भरघोस आहेच शिवाय त्याच्या हिंदी आवृत्तीचं यशही भरीव आहे. खरंतर प्रभास चा हा चित्रपट शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘डंकी’ या चित्रपटानंतर एक दिवसाने प्रदर्शित झाला होता. एवढ्या मोठ्या चित्रपटाच्या आगमनाने सुरुवातीला सलार ला स्क्रीन मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण प्रभास च्या स्टारडम ने हिंदी चित्रपट रसिकांवरही जादू केली. या मागील गुरुवारीच सलारने बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला. या एका आठवड्यात त्याचं नेट इंडियन कलेक्शन ३०८ कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. ज्यामध्ये या चित्रपटाच्या तेलगू आवृत्तीच्या यशाचा मोठा सहभाग होता कारण प्रभास चा तेलगू चाहता वर्ग नेहमीच त्याची पाठराखण करत आला आहे. सलार च्या तेलगू आवृत्तीची कमाई १८६ कोटी रुपये होती. तर हिंदी आवृत्तीने ७ दिवसांत चक्क ९२ कोटीची कमाई केली ! आणि हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार या दुसऱ्या शुक्रवारी सलार ने १० कोटीपेक्षा जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन नोंदवलं आहे. म्हणजे ८ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे ३१८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
ट्रेड एनालिस्ट निशित शॉ यांनी शुक्रवारी या गोष्टीची पुष्टी केली की, सलारच्या हिंदी आवृत्तीची नेट कमाई १०० कोटी झाली आहे. ‘साहो’ आणि ‘आदिपुरुष’ नंतर १०० कोटी कलेक्शन करणारा प्रभासचा हा पाचवा चित्रपट आहे आणि प्रभास एकमेव असा अभिनेता ठरला आहे, ज्याच्या एकापेक्षा जास्त चित्रपटांनी १०० कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. विशेष म्हणजे यश, रजनीकांत, अल्लू अर्जुन, जूनियर एनटीआर-राम चरण अशा दिग्गज कलाकारांकडेही १०० कोटींची कमाई करणारा प्रत्येकी एकच चित्रपट आहे.
यंदाचं न्यू इयर सेलिब्रेशन आणि वीकएन्ड असा योग जुळून आला आहे. त्याचा परिणाम ऍडव्हान्स बुकिंग वाढण्यात झालेला आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी सलार ला निश्चितच कामी येणार आहे. शक्यता आहे की, हा शनिवार- रविवार सलार बॉक्स ऑफिसवर विक्रमी नोंद करून एक मोठी झेप घेईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -