घरमुंबईम्हाडा टेस्टिंग लॅबचे कामकाज आता ऑनलाईन

म्हाडा टेस्टिंग लॅबचे कामकाज आता ऑनलाईन

Subscribe

पारदर्शकता येणार, वेळ वाचणार

युझर फ्रेंडली, वेळेची बचत करणारी तसेच पेपरलेस अशा स्वरूपाची ऑनलाईन प्रणालीची सुरूवात सोमवारी म्हाडामध्ये झाली. म्हाडाच्या बांधकाम चाचणी प्रयोगशाळेचा (टेस्टिंग लॅब) वापरकर्त्या ग्राहकांना या प्रणालीचा वापर करणे शक्य होईल. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी म्हाडाच्या बांधकाम चाचणी प्रयोगशाळेतील सर्व कामकाज प्रशासनाच्या कक्षेत आणले. प्रयोगशाळेच्या कामकाजाकरिता विशेष ऑन लाईन प्रणालीचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. म्हाडाच्या बांधकाम साहित्य चाचणी प्रयोगशाळेमार्फत होणारी सर्व कामे यापुढे ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य होणार आहे. पहिल्याच दिवशी या ऑनलाईन सेवेचा १५ संस्थांनी लाभ घेतला.

बांधकामाशी संबंधित चाचण्यांचे नोंदणीकरण, चाचण्यांचे शुल्क, बांधकाम साहित्य चाचण्यांचे अहवाल इत्यादी सर्व कामे ऑनलाईन प्रणालीद्वारे कालबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहेत. नवीन आर्थिक वर्षांपासून सुरू करण्यात आलेली, ऑनलाईन कार्यप्रणाली प्रयोगशाळेच्या कामकाजात सुसुत्रीपणा नक्कीच आणेल, असे मत म्हैसकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

- Advertisement -

असा वापरा ऑनलाईन पर्याय
म्हाडाच्या दक्षता व गुणनियंत्रण कक्षांतर्गत कार्यरत साहित्य चाचणी प्रयोगशाळेमध्ये म्हाडाची विविध मंडळे, विभाग तसेच अनेक शासकीय व खाजगी संस्था विविध प्रकारच्या चाचण्या नियमितपणे करवून घेत आहेत. या सर्व संस्था, कंत्राटदार, म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mhada.gov.in वरील citizen corner मधील material testing laboratory या टॅब वरून log in करू शकतील. तसेच https://mtl.mhada.gov.in या url वरून log in करू शकतील.

ग्राहकांकरिता ही सुविधा अखंड उपलब्ध असणार आहे. या संगणकीय प्रणालीमध्ये ग्राहकांची एकदा नोंदणी झाल्यास कायमस्वरूपी डेटा संकेतस्थळावर तयार होणार आहे. ज्यामुळे संबंधित ग्राहकास पुन्हा बांधकाम साहित्यांची चाचणी करावयाची झाल्यास केवळ कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागेल. तसेच साहित्य चाचण्यांकरिता आकारण्यात येणारे शुल्क भरणा व त्यांची पोचपावती ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांचा जीएसटी भरण्याबाबतचा तिढादेखील सुटणार आहे.

- Advertisement -

ग्राहकांना या नवीन प्रणालीचा सराव होण्याच्या दृष्टीने एक महिन्याच्या कालावधीकरिता ऑनलाईन व ऑफलाईन शुल्क भरण्याचा विकल्प ग्राहकांना उपलब्ध करवून देण्यात आला आहे. साहित्य चाचणी करण्यासाठीचे संबंधित विभागाचे पत्र व बांधकाम साहित्य नमुने प्रयोगशाळेत स्वीकारण्यात येतील. संबंधित अधिकार्‍यांच्या डिजिटल स्वाक्षर्‍या असलेले साहित्य चाचणी अहवाल संस्थांना / विभागांना ई-मेल द्वारे थेट पाठविण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरणे, नोंदणी करणे, साहित्य चाचणी शुल्क इ माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावर माहिती पुस्तिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीकरिता प्रयोगशाळेत हेल्प डेस्कदेखील कार्यरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -