घरमुंबईइंजिनियरिंगच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण घटले

इंजिनियरिंगच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण घटले

Subscribe

यंदा राज्यातील ४४.७५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तर गतवर्षी हेच प्रमाण ४८ टक्के इतके होते. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी ओढा हा खासगीपेक्षा सरकारी संस्थांकडे अधिक आहे.

काही वर्षांपासून इंजिनियरिंगच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहत होत्या. मात्र यंदा जागा रिक्त राहण्याच्या प्रमाणामध्ये ३.२५ टक्क्यांनी घट झाली आहे. इंजिनियरिंगच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिला आहे. इंजिनियरिंगला ६८ हजार ४५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे यंदा राज्यातील ४४.७५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. तर गतवर्षी हेच प्रमाण ४८ टक्के इतके होते. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी ओढा हा खासगीपेक्षा सरकारी संस्थांकडे अधिक आहे. त्यामुळे खासगी संस्थांमधील तब्बल ५४ हजार ६६७ जागा रिक्त राहिल्याने बहुतांश महाविद्यालयातील वर्ग ओस पडले आहेत.

इंजिनियरिंग पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून मागणी नसल्याने काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे गतवर्षी तब्बल ९ संस्थांनी इंजिनियरिंग अभ्यासक्रम रद्द केला होता. त्यामुळे ३६४२ जागा कमी झाल्या होत्या. त्यातच यंदा कोरोना आणि मराठा आरक्षण यामुळे प्रवेश प्रक्रिया रेंगाळली होती. त्यामुळे यंदा अधिकच प्रवेश कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र गतवर्षी ६५ हजार ९२३ विद्यार्थ्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतले होते. यंदा हेच प्रमाण ६८ हजार ४५१ इतके आहे. त्यामुळे जागा कमी झाल्याने रिक्त जागांच्या टक्केवारीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल अडीच हजारांनी अधिक प्रवेश झाले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी सरकारी संस्थाकडे अधिक कल असल्याने खासगी संस्थांमधील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या आहेत. राज्यभरात ३३१ संस्था असून, ३१० संस्था विनाअनुदानित आहे. राज्यातील १ लाख २३ हजार ८९५ जागांपैकी १ लाख १७ हजार २३४ जागा खासगी संस्थांमध्ये आहेत. त्यापैकी केवळ मागणी असलेल्या अभ्यासक्रम धरुन ६२ हजार ५६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर या संस्थांत ५४ हजार ६६७ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यात २१ शासकीय संस्थामधील ६ हजार ६६१ जागापैकी ५ हजार ८८४ जागांवर प्रवेश झाले आहेत. तर ७७७ जागा रिकामी राहिल्या आहेत.

- Advertisement -

अभियांत्रिकी पदव्युत्तरच्याही ५५.२१ टक्के जागा रिक्त

एम ई (अभियांत्रिकी पदव्युत्तर)च्या १९६ असलेल्या संस्थात १२ हजार ४५६ इतक्या जागा होत्या. त्यापैकी ५ हजार ५७९ जागावर प्रवेश झाले आहेत. तर ६ हजार ८७७ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागा राहण्याची टक्केवारी ५५.२१ टक्के इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -