घरमुंबईकुपर रुग्णालयात रुग्णाने घेतला डॉक्टरच्या हाताचा चावा!

कुपर रुग्णालयात रुग्णाने घेतला डॉक्टरच्या हाताचा चावा!

Subscribe

कुपर रुग्णालयात उपचार करत असताना एका रुग्णाने डॉक्टरच्या हाताचा चक्क चावा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जुहू येथील डॉ.आर. एन. कूपर रुग्णालयामध्ये काही दिवसापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांवर हल्ला केला होता. मात्र आता डॉक्टराच्या हाताला रुग्णाने चावा घेतल्याची घटना समोर येत आहे. या हल्ल्याची घटना समजताच महापौरांनी संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी येण्याबाबत दिशानिर्देश निश्चित करण्याची सूचना महापौरांनी यावेळी संबंधित डॉक्टरांना केली. महापालिकेच्या डॉ.आर.एन. कुपर रुग्णालयात उपचार करत असताना एका रुग्णाने डॉक्टरच्या हाताचा चक्क चावा घेतला होता. घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी या रुग्णालयाला भेट देत अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी भेट दिली. त्यानंतर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयाला भेट देऊन याठिकाणी डायलिसिस रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी केली. डायलिसिस रुग्णांसाठी १६ बेड आरक्षित करण्यात आले असून यापैकी चार बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर तसेच दोन्ही रुग्णालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

तसेच महापौरांनी टी विभाग कार्यालयाला भेट देऊन विभागातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. येथील झोपडपट्ट्यांमध्ये स्वॅबचे नमुने मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्याने आणि कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून या रुग्णांसाठी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे, असे सहाय्यक आयुक्त यांनी महापौरांना सांगितले. तसेच महापौरांनी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्याशीही विभागातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली.

दरम्यान महापौरांनी ‘एल’ विभाग कार्यालयाला भेट देऊन कोरोनाच्या सद्यस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, विभागातील सी.सी रोडचे काम, मोठे नाले व छोटे नाले यांची साफसफाई किती प्रमाणात झाली याचा एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले. याप्रसंगी नगरसेवक कप्तान मलिक व वाजीद कुरेशी उपस्थित होते.


Corona: युएईमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने भारतीय नृत्यांगनेचे गेले प्राण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -