घरदेश-विदेशCorona: युएईमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने भारतीय नृत्यांगनेचे गेले प्राण

Corona: युएईमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने भारतीय नृत्यांगनेचे गेले प्राण

Subscribe

दुबई शहरातील कोरोना रूग्णांनी भरलेल्या हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने भारतीय शास्त्रीय नृत्यांगना दिपा नायर यांचे निधन

संयुक्त अरब अमिरात (यूएई) दुबई शहरातील कोरोना रूग्णांनी भरलेल्या हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने भारतीय शास्त्रीय नृत्यांगना दिपा नायर यांचे निधन झाले. ४७ वर्षीय दिपा नायर या युएईच्या सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि चर्चेतील नाव होतं. दिपा नायर या मुळच्या केरळच्या रहिवासी असून त्या इव्हेंट मॅनेजर म्हणूनही काम पाहत होत्या.

कोरोना नसता तर प्राण वाचले असते…

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, हृदयविकाराच्या आजारामुळे दिपा यांनी रविवारी अल नहद येथील त्यांच्या घरी शेवटचा श्वास घेतला. तिचे पती सूरज मूसाद यांनी सांगितले की, “आम्हाला असे वाटते की कोरोनाचा काळ नसता तर ती जिवंत राहिली असती.” तसेच २०११ मध्ये त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया देखील झाली होती. दरम्यान बर्‍याचदा पोटात गोळा येणं आणि अतिसार या आजाराची तिची तक्रार नेहमी असायची.

- Advertisement -

दुबईत १९ वर्षे राहत असलेल्या सूरज यांनी सांगितले की, ‘रविवारी पहाटे दिपा यांना अस्वस्थ वाटल्याने दुबईतील रुग्णालयात घेऊन गेलो होतो. त्या रूग्णालयात १४० कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यानंतर आम्ही दुसर्‍या रूग्णालयात गेलो, पण कोरोना रूग्णांमुळे दिपाला तिथे ही दाखल करण्यात आले नाही. त्यानंतर ही आम्ही दुसर्‍या रुग्णालयात गेलो, तिथे तिला दाखल करण्यात आले. मात्र त्याच दिवशी सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

कोरोना दरम्यान रूग्णालयात योग्य उपचार नाही

घरी परत आल्यावर त्यांची तब्येत पुन्हा खालावली. तिला खूप आजारी वाटत होती आणि तिचे हात पाय थंड पडले होते. परंतु आम्ही तिला दवाखान्यात नेले नाही. कारण आम्हाला आलेल्या अनुभवावरून यावेळीही उपचार होणार नाही असेच वाटले. म्हणून आम्ही रूग्णालयात जाण्याऐवजी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावले पण तोपर्यंत उशीर झाला आणि सायंकाळी चार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला, असे दिपा नायर यांच्या परिवाराने सांगितले.


मराठा आरक्षणाचे सेनानी शांताराम कुंजीर यांचे निधन; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -