घरमुंबईमाथेरानच्या रस्त्यांची दैना

माथेरानच्या रस्त्यांची दैना

Subscribe

हातरिक्षा, घोडे व्यवसायावर संक्रांत

देशातील इंधनावर चालणारे वाहन बंदी असलेल्या माथेरान या एकमेव पर्यटनस्थळाच्या ठिकाणी दळवळणासाठी वापरण्यात येणारे घोडे आणि हातरिक्षा यांचा व्यवसाय संकटात आला आहे. रस्त्यांची दैना उडाल्यामुळे ही अवस्था झाली आहे.

प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरिता दरवर्षी लाखो पर्यटक या गिरिस्थानावर येत असतात. पर्यटकांना विविध स्थळांना भेट द्यायची असते तेव्हा वाहनाची उपलब्धता नसल्याने स्वाभाविक घोडा किंवा हातरिक्षाचा आधार घेत असतात. मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यावरून घोडा किंवा हातरिक्षा नेणे जिकरीचे झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांमध्ये दगड-गोटे खच पडल्याप्रमाणे वर आल्यामुळे पर्यटकांची प्रेक्षणीय स्थळांवर वर्दी घेऊन जाण्यासाठी या व्यावसायिकांना कसरत करावी लागते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे घोड्यांच्या पायांना दुखापती होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. हातरिक्षाही वाटेतच मोडून पडण्याचे प्रकार घडत आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी दस्तुरी येथे एमएमआरडीएच्या अंतर्गत होणार्‍या प्लेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. मात्र परिस्थिती जैसे थे असून, घोडेवाले व हात रिक्षावाले यात भरडून निघत आहेत. माथेरानची मिनी ट्रेन बंद असल्याने अगोदरच पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यात येणार्‍या पर्यटकांना फिरण्यासाठी धडपणे रस्तेही नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळी व नाताळमधील पर्यटन हंगाम लक्षात घेऊन तरी रस्त्यांची परिस्थिती सुधारावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मध्यंतरी हर हर चांगभले धनगर समाजाने, तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यासाठी श्रमदान केले. मात्र नगर परिषदेने त्यातून कोणताच बोध घेतलेला दिसत नाही. या संदर्भात नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता चेतन तेलंगे यांच्याकडे विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे देत मुख्याधिकार्‍यांशी बोलण्याचा सल्ला दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -