घरमुंबईपोलीस उपनिरीक्षकांची 115 वी तुकडी सज्ज

पोलीस उपनिरीक्षकांची 115 वी तुकडी सज्ज

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान

महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 115 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ 5 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत दिमाखात पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, रणजीत पाटील, दीपक केसरकर उपस्थित होते. शिवाय महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलिस दलांपैकी एक आहे. केवळ दोषींना शिक्षा करण्यासाठी आपले पोलीस दल ओळखले जात नाही, तर संवेदनशीलतेसाठीसुद्धा ते ओळखले जाते. नागरिकांची सेवा करणे आणि त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देणे हे आपले परमकर्तव्य आहे. अडचणीच्या प्रसंगी आपण परिस्थिती कशी हाताळतो, यावरच आपले व्यावसायिक कौशल्य अवलंबून असते. कायदा व सुव्यवस्था राखताना आपण संवेदनशीलता जपली पाहिजे. त्याशिवाय आपण आपल्या कर्तव्याची पूर्तता करू शकत नाही. आनंद असो की राग दोन्ही प्रसंगात आपली शिस्त कायम असली पाहिजे. तत्परता आणि संयम यात उत्तम ताळमेळ असला पाहिजे, असे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

पोलिसांसाठी निवासस्थान असलेल्या सप्तश्रृंगी संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. 168 पोलिसांसाठी ही निवासस्थाने असून त्यासाठी 41.87 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. 1500 प्रेक्षक क्षमतेच्या ओपन एअर थिएटरचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्घाटन केले. त्यावर 3.60 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.

प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणारे पोलीस उपनिरीक्षक

राजेश ज्ञानदेव जवरे (बुलढाणा), मारुती जगझापे (सोलापूर), किरण पाटील (धुळे), कुणाल चव्हाण (नाशिक), नागेश येनपे (सोलापूर), लक्ष्मी सपकाळे (जळगाव), मंगेश बाचकर (अहमदनगर), तर प्रकाश कदम (कोल्हापूर) यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -