घरमुंबईग्रामीण भाग उजळणार 3500 पथदिव्यांनी

ग्रामीण भाग उजळणार 3500 पथदिव्यांनी

Subscribe

पालिका हद्दीत सामाविष्ट ग्रामीण भाग लवकरच एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. नुकतेच या कामाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीला हे काम देण्यात आले आहे.पालिकेची स्थापना करताना नगरपालिका क्षेत्रासहित कळंबोली, कामोठे, नविन पनवेल, खांदेश्वर तसेच खारघर या सिडकोने वसवलेल्या वसाहतींसोबतच 29 ग्रामपंचायतींचा समावेश पालिका क्षेत्रात करण्यात आला आहे. या पैकी जवळपास 70 टक्के भाग हा सिडकोने विकसीत केलेला असल्याने या भागाला बर्‍यापैकी सेवा सुविधा सिडकोकडून पुरवण्यात आल्या आहेत. मात्र त्या तुलनेने अनेक वर्षानपासून ग्रामपंचायती अस्तीत्वात असलेल्या भागांचा विकास झाला नसल्याने ग्रामीण भागाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

दहा कोटींचा निधी
पालिका हद्दीत बसवण्यात येणार असलेल्या 3500 पोल पैकी जवळपास 80 टक्के पोल ग्रामीण भागात बसवण्यात येणार असून त्या करता 10 कोटी रुपयांचा निधी पालिकेकडून उपलब्ध केला जाणार आहे. पालिकेने उभारलेल्या पोल वर केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ईईएसई कंपनीकडून पोलवर दिवे बसवले जाणार आहेत. बजाज कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागाला विविध सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने कामांना सुरुवात केली आहे. पथदिवे उभारण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल.
– अभिमन्यू पाटील, सभापती, अ प्रभाग समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -