घरमुंबईलॉ शाखेचे विद्यार्थ्यांचे आज ठिय्या आंदोलन

लॉ शाखेचे विद्यार्थ्यांचे आज ठिय्या आंदोलन

Subscribe

निकालाला होत असलेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थी आक्रमक

विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात आणि लॉ शाखेच्या निकालाला होत असलेल्या दिरंगाईविरोधात महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला) तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनसमोर सकाळी साडेबारा वाजता हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

एलएलबी, एलएलएमचे निकाल तात्काळ जाहीर करावे, मुख्य निकाल जाहीर केल्यानंतर १० दिवसांत पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर करावे, सर्वच सेमिस्टरच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑफलाईन करून विद्यापीठ स्तरावर करावे, विद्यार्थ्यांना तात्काळ बॅचलर ऑफ जनरल डिग्रीचे प्रमाणपत्र द्यावे, एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्नपत्रिका उपलब्ध कराव्यात, तसेच लॉ शाखेचा निकाल तातडीने लावावा या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठ लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना कमी लेखत आहे, असा आरोपही इंगळे यांनी केला.

- Advertisement -

लॉ शाखेचे निकाल लवकरच
तीन वर्षीय लॉ शाखेचे सत्र ५ च्या परीक्षेचे मुल्यांकन सुरु असून ८० टक्के मुल्यांकन झाले आहे. उर्वरित मुल्यांकन लवकर करण्यासाठी लॉ कॉलेजच्या प्राचार्यांना निर्देश दिले आहेत. यानुसार विधी शाखेचे शिक्षक मुल्यांकन करीत आहेत. हा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे, असे मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -