घरमुंबईरस्त्यावर थुंकणार्‍या वसईकरांकडून १३ लाख दंड वसूल

रस्त्यावर थुंकणार्‍या वसईकरांकडून १३ लाख दंड वसूल

Subscribe

रस्त्यांवर थुकून घाण करणार्‍या वसईकरांकडून महापालिकेने महिनाभरात 13 लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. वसई तालुक्यातील महापालिकेच्या हद्दितील सार्वजनिक ठिकाणी थुकूंन,कचरा टाकून किंवा लघवी करणार्‍यांकडून पुन्हा एकदा दंड वसूल करण्याची मोहिम महापालिकेने सुरु केली आहे. त्यासाठी चार कंपन्यांना ठेका देण्यात आला असून,9 प्रभाग समितीत प्रत्येकी 10 नुसार 90 क्लिनअप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. हे मार्शल 2021 पर्यंत कार्यरत राहणार असून, त्यांनी 10 नोव्हेंबरपासून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. शहरातील शाळा, कॉलेज,रुग्णालये, मुख्य रस्ते, बाजारपेठा, एस. टी.डेपो, रेल्वेस्टेशन परिसर, धार्मिक स्थळे अशा ठिकाणी हे मार्शल नजर ठेवून आहेत.

या ठिकाणी घाण करणार्‍यांना शंभर रुपयांपासून पाचसे रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यात अशाप्रकारे 13 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यातील 30 टक्के रक्कम ठेकेदाराला देण्यात येणार आहे. तर 70 टक्के पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहेत. मात्र, दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी जनजागृती करून तसेच ठिकठिकाणी फलक लावून लोकांना आवाहन करण्याचे आदेश महापालिकेकडून ठेकेदारला देण्यात आले होते. मात्र,आवाहन न करता स्वतःच्या नफ्यासाठी आणि जास्तीत जास्त दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ठेकेदाराने थेट कारवाई करण्यास सुरवात केली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

- Advertisement -

पालिकतर्फे जनजागृती करण्यात आल्याचा दावा ठेकेदाराच्यावतीने वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक वसंत मुकणे यांनी केला आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, क्लिनअप मार्शल दमदाटी करून दंड वसूल करतात, असा आरोप आहे. वसुलीपुर्वी जनजागृती करण्यात आली नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे वाढल्या आहेत. त्यामुळे ठेकेदार, क्लिनअप मार्शल यांची बैठक घेवून, त्यांना आवश्यक त्या सूचना वजा आदेश देण्यात येणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -