घरमुंबईक्षुल्लक वादातून इसमाची गळा आवळून हत्या

क्षुल्लक वादातून इसमाची गळा आवळून हत्या

Subscribe

अंधेरीतील घटना; आरोपीस अटक व कोठडी

क्षुल्लक वादातून सिराज मेनुद्दीन सय्यद या 41 वर्षांच्या इसमाची त्याच्याच परिचित आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी सुनिल महादेव मराठे याला सहार पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता अंधेरीतील सहार गाव, शांतीनगरातील वेअर हाऊस बसस्टॉपजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

शमशुद्दीन कुतूबउद्दीन सय्यद हा शांतीनगरच्या आदर्श चाळीत राहत असून मृत सिराज हा त्याचा चुलत भाऊ आहे. सिराज हा त्याच्या कुटुंबियांसोबत त्याच परिसरात राहतो. मंगळवारी शमशुद्दीन, सिराज आणि इतर पाच ते सहा मित्र वेअर हाऊस बसस्टॉपवर गप्पा मारीत बसले होते. यावेळी तेथून सुनिल मराठे हा जात होता. यावेळी सिराजने त्याला तिथे बोलाविले, मात्र त्याने येण्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात हाणामारी झाली, या हाणामारीत सिराज हा बेशुद्ध झाल्याने त्याला त्याच्या मित्रांनी मुकुंद रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले, त्यामुळे त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

- Advertisement -

याप्रकरणी सहार पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह मारामारीचा गुन्हा नोंदविला होता. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने सिराजचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या कलमांची वाढ करुन आरोपी सुनिल मराठे याला अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -