घरमुंबईहायब्रीड बसला कमी प्रतिसाद

हायब्रीड बसला कमी प्रतिसाद

Subscribe

तिकीट दारात कपात होणार

हायब्रीड बसच्या तिकीट दारात कपात होणार एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या बिकेसीतील हायब्रीड बसला नोकरदार वर्गाकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याने या बसच्या तिकीट दरात कपात करणार करण्याची सूचना एमएमआरडीए बेस्टला करणार असल्याचे एक वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

प्रवाशांच्या संख्येत वाढ व्हावी आणि हायब्रीड बसचा तोटा कमी व्हावा, यासाठी एमएमआरडीए आणि बेस्ट यांच्यात चर्चा करण्यात येत आहे. सध्या बेस्टच्या माध्यमातून २५ एसी हायब्रीड बसचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. हायब्रीड बससाठी चालकांची संख्या कमी असल्याने या बसच्या फेर्‍या कमी असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. त्यातून तिकिटांचे दर २१ रुपये आकारल्याने प्रवाशांची संख्या रोडावल्याचे चित्र आहे. त्यातच बीकेसीसह ठाणे, बोरिवली या दूरपर्यंत धावणारी एसी हायब्रीड बस पार्क करण्यासाठी नजीकचे सुरक्षित बस डेपो हे केवळ धारावी येथे असल्याचे इंधनाचा अपव्यय होतो. दर महिन्याला तब्ब्ल १ कोटी रूपाचे नुकसान होत असून हा तोटा भरून काढण्यासाठीच तिकिटाचे दर कमी करण्याचा पर्याय एमएमआरडीए बेस्ट पुढे ठेवणार आहे. बीकेसीच्या विविध ब्लॉक, एक्सिब्युशन सेंटर, अंतर्गत कार्यालये इथपर्यंत चाकरमान्यांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मार्च २०१८ मध्ये हायब्रीड बससेवा सुरु करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -