घरमुंबईखूशखबर! एकाच दिवसात पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली

खूशखबर! एकाच दिवसात पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली

Subscribe

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सर्व तलावांमध्ये एकाच दिवशी पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली आहे.

गेल्या दोन दिवसात ठाणे तसेच नाशिक भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ‘थेंबे थेंबे तळे साचे’, अशी परिस्थिती असलेल्या मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सर्व तलावांमध्ये एकाच दिवशी पाण्याची पातळी ७ मीटरने वाढली आहे. या सर्व तलावांमध्ये गुरुवारी ५६.८७ टक्के एवढा साठा होता, त्या तुलनेत शुक्रवारी ६४.१४ एवढा पाणी साठा जमा झाला आहे.

पाणीसाठा ९० हजार दशलक्ष लिटर्सने वाढला

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी पाठोपाठ गुरुवारी दुपारी तानसा तलाव भरून वाहू लागले. त्यामुळे गुरुवारी एकूण पाण्याचा साठा या सर्व तलावामध्ये ८ लाख ३७ हजार ३९५ दशलक्ष लिटर्स एवढा होता. पण शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीत हा साठा ९ लाख २८ हजार ३२६ दशलक्ष लिटर्स एवढा झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तसेच तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मात्र, २६ जुलै २०१९ रोजी यासर्व तलावांमध्ये ९ लाख २८ हजार ३२६ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे. मात्र, मागील दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही १८ ते २०टक्के पाणी साठा कमी आहे.

२६ जुलै पर्यंतचा पाणीसाठा

  • २०१९ :  ९लाख २८ हजार ३२६ दशलक्ष लिटर्स (६४.१४ टक्के)
  • २०१८ :  ११लाख ९१ हजार ७५४ दशलक्ष लिटर्स (८२.३४टक्के)
  • २०१७ :  १२ लाख २१ हजार ६८२ दशलक्ष (८४.४१ टक्के)

हेही वाचा –

शिवसैनिकांनी दिली भुजबळांना ‘लखोबा लोखंडे’ची उपमा

- Advertisement -

भुजबळांच्या घरवापसीला शिंदे, राऊत, देसाईंचाच विरोध!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -