घरमुंबईमुरबाड तालुक्यात ४० कोटींचे रस्ते होणार

मुरबाड तालुक्यात ४० कोटींचे रस्ते होणार

Subscribe

मुरबाड तालुक्यातील तब्बल ६८ किमीहून अधिक रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन बुधवार, २ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या रस्त्यांची एकत्रित किंमत सुमारे ४० कोटी रुपये आहे. जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचे जाळे मजबूत करावे लागणार, या हेतूने जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाचा निधी आणला आहे. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही कोट्यवधींची कामे मंजूर केली आहेत.

दोनच दिवसांपूर्वी शीळ कल्याण भिवंडी या सहा पदरी कामाचे भूमिपूजन पार पडले असतानाच बुधवारी मुरबाड तालुक्यातील रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात राज्य महामार्ग ७९ ते शिरवली वडाचीवाडी फणसोळी-सुकाळवाडी (८ किमी, ४ कोटी), धसई-कळंबाड- मढ, रामपूर रस्ता (५.३ किमी, २.७९ कोटी), राज्य महामार्ग ७८ पारगाव ते बालकीचा पाडा (६ किमी, ४.११ कोटी), राज्य महामार्ग ७९ ते पवाळे, कोळठण, भादाणे रस्ता (८.६४ किमी, ४.४५ कोटी), किसळ-धारगाव संगम रस्ता (५ .७५ किमी, ३.३६ कोटी), राष्ट्रीय महामार्ग २२२ नांदगाव-मानिवली-ठुणे-पाडाळे रस्ता (१०.३७ किमी, ५.४५ कोटी), राष्ट्रीय महामार्ग २२२ पोटगाव-उंबरवाडी-चोण रस्ता (११.६ किमी, ५.३९ कोटी), राष्ट्रीय महामार्ग २२२ टेंबरे-बुद्रुक जोड रस्ता (२.२७ किमी, १.२९ किमी) आदी महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे होणार आहेत. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, महाराष्ट्र हातमाग महामंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख (भिवंडी) प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -