घरमुंबईकळव्यातील रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन येणार

कळव्यातील रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन येणार

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कळवा परिसरातदेखील विकासाच्या दृष्टीने नागरीवस्ती झपाट्याने वाढत आहेत. या परिसरात लाखोंच्या संख्येने दररोज प्रवासी लोकलमधून ये-जा करतात. त्यामुळे सकाळच्यावेळी स्थानकातून महिला तसेच पुरुष प्रवाशांना गर्दीमुळे लोकल पकडता येत नाही. पण नाईलाजात्सव प्रवाशांना लोकल पकडावी लागत आहे. मात्र आता या त्रासातून कळव्यातील प्रवाशांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळवा रेल्वे स्थानक येथे अजून दोन प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहेत. यामुळे फलाटावरील मुंबईच्या दिशेकडील पूल दोन नंबर फलाटाच्या बाजूला कारशेडच्या जागेत उतरवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कळवा येथून प्रवास करणार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

कळवा रेल्वे स्थानक येथे प्रवाशांना सकाळच्या वेळी गर्दीमुळे चढता येत नसल्याने प्रवासी कारशेडमधून सकाळी निघणारी लोकल रुळावर उभं राहून पकडतात. मात्र दोन प्लॅटफॉर्म वाढवण्यासोबतच फलाटाची रुंदीही वाढणार आहे. तसेच जुने तिकीट बुकिंग कार्यालय हटवण्यात येणार असून कारशेडच्या जागी नवीन तिकीट कार्यालय उभारण्यात येणार आहे. नवीन तिकीट कार्यालयाकडे जाण्याकरता कारशेड येथील रेल्वे पोल क्रमांक ३७ पासून न्यू शिवाजी नगर पादचाचारी पुलापर्यंत कारशेडमधून निघणार्‍या लोकलकरता रुळाच्या दोन्ही बाजूने फलाट तयार केले, तर प्रवाशांना कारशेड येथून सुरक्षितपणे लोकल पकडता येणार आहे. सध्या कळवा स्थानकातील दोन नंबर फलाटाची रुंदी वाढवण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

कारशेड येथून सकाळी निघणार्‍या लोकल प्रवाशांना पकडण्याकरता या ठिकाणी फलाट तयार करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाच्या मुंबई येथे झालेल्या डीयूआरसीसी बैठकीमध्ये रेल्वे बोर्डाच्या विषय पत्रिकेत प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असून रेल्वे बोर्डाकडून तसे संकेतही मिळत आहेत.
– अमोल कदम, सदस्य, सेंट्रल रेल्वे बोर्ड, सल्लागार समिती

कारशेडमधून निघणार्‍या लोकलकरता फलाट उभारणे शक्य असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कारशेड येथून निघणारी लोकल सुरक्षितपणे पकडण्याकरता फलाट उभारण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणे अपेक्षित आहे. होम प्लॅटफॉर्म होण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील आहोत. ज्यामुळे कळव्यातील प्रवाशांचा काही प्रमाणात तरी त्रास कमी होईल.
– जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -