घरमुंबईमहिलांना नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तिघांना अटक

महिलांना नोकरीचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तिघांना अटक

Subscribe

महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन सेक्स रॅकेट चालविणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला.

महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन सेक्स रॅकेट चालविणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह खंडणी आणि पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद कमाल अन्वर शेख, टिंकू दिनेश राज आणि फरीद उल हक अजीज उल हक शहा ऊर्फ टिपू अशी या तिघांची नावे असून ते तिघेही एजंट म्हणून काम करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहे. त्यांच्याच परिचित एका महिलेला नोकरीची गरज होती. यावेळी त्यांनी तिची ओळख मोहम्मद कमाल याच्याशी करुन दिली. त्यानंतर मोहम्मद कमालने टिंकू आणि फरीदच्या मदतीने तिची एका व्यावसायिकाशी ओळख करुन दिली. हा हॉटेल व्यावसायिक असून त्याचे बाहरीन येथे स्वतःचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या किचनमध्ये स्वयंपाकी म्हणून काम देण्याचे आमिष तिला दाखविण्यात आले होते. १३ जुलै २०१८ रोजी ही महिला बाहरीन येथे गेली होती, मात्र तिथे गेल्यानंतर या व्यावसायिकाने तिला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. तिला तिथेच कोंडून ठेवले. काही दिवसांनी तिने हा प्रकार तक्रारदारासह तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तक्रारदाराने मोहम्मद कमालशी संपर्क साधून तिची सुटका करण्याची विनंती केली, मात्र तिच्या सुटकेसाठी त्याने त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने तिची सुटका केली होती. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, पोलिसांकडे जाऊ नकोस नाहीतर जिवे ठार मारु अशी धमकी दिली होती. भारतात येताच त्यांनी हा प्रकार मुंबई पोलिसांना सांगितला.

सुरू होते विदेशात सेक्स रॅकेट

या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच मुंबई शहरात एजंट म्हणून काम करणार्‍या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात ते तिघेही या गुन्ह्यांतील पाहिजे व्यावसायिक आरोपीच्या मदतीने विदेशात सेक्स रॅकेट चालवित होते. त्यांनी अनेक महिलांना विदेशात विशेषतः बाहरीन, दुबईसह इतर देशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखविले होते. या महिला विदेशात गेल्यानंतर त्यांना तिथे कोंडून ठेवून जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात होते. या गुन्ह्यांतील इतर पिडीत महिलांसह तरुणीचा आता पोलिसांकडून शोध सुरु आहे.

- Advertisement -

 

वाचा – डॉक्टरांच्या मदतीने अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -