घरताज्या घडामोडीCoronavirus : मुंबईत करोनाचे ३ तर ठाण्यात १ पॉझिटिव्ह

Coronavirus : मुंबईत करोनाचे ३ तर ठाण्यात १ पॉझिटिव्ह

Subscribe

सध्या करोनाचे मुंबईत तीन तर ठाण्यात एक जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

मुंबईत सध्या करोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून सरकारकडून करोनासोबत दोन हात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर, राज्यात आतापर्यंत १७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली जात आहे. तसेच, रुग्णांना उपचार आणि लक्षणे नसलेल्या प्रवाशांचे १४ दिवसांपर्यंत संपर्क केला जात आहे. दरम्यान, पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आता खासगी हॉस्पिटलमध्येही विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये १५ खाटा, बीपीटी हॉस्पिटलमध्ये ५० खाटा, बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे हॉस्पिटलमध्ये ३० खाटा अशा एकूण २३३ खाटा पालिका आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

स्क्रिनिंग प्रवाशांची संख्या – २ लाख १७ हजार ६३६
त्यापैकी लक्षण असलेले प्रवाशांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल – २३८
निगेटिव्ह अहवाल – २०३
यापैकी २८ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
निदान झालेले करोनाबाधित रुग्ण – ४ (मुंबई ३, ठाणे १)

- Advertisement -

हिंदुजा हॉस्पिटलमधील ८५ कर्मचाऱ्यांना वेगळं राहण्याच्या सुचना

सध्या जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना घाबरण्यापेक्षा काळजी घेण्याचं आवाहन सरकारतर्फे केलं जातंय. यातच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे ८५ कर्मचाऱ्यांना वेगळे राहण्याची सुचना (अलगीकरण) देण्यात आल्या आहेत. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ८ मार्च या दिवशी हृदयाच्या विकारासंबंधित उपचारांसाठी एक रुग्ण दाखल झाला होता. पण, त्याने दुबई प्रवासाची माहिती हॉस्पिटल प्रशासनाला दिली नसल्याचं सांगितलं जातं. दरम्यानच्या काळात हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं काही तपासणी केल्यानंतर समजलं. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हिंदुजा हॉस्पिटलने इथल्या ८५ कर्मचाऱ्यांना वेगळे राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. शिवाय, याच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ७ व्यक्तींना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करुन तपासणी करण्यात आली आहे. तसंच, अजून ७ व्यक्ती कमी प्रमाणात संपर्कात आल्याने त्यांना त्यांच्या घरी १४ दिवस वेगळे ठेऊन त्यांचं निरीक्षण केलं जातं आहे.

आतापर्यंत हा रुग्ण राहत असलेल्या परिसरात पाच टीमद्वारे सर्वे करुन ४६० घरांची पाहणी केली आहे. त्यात एकही लक्षणे असलेली व्यक्ती आढळलेली नसल्याचं पालिका उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात करोनाचा दुसरा बळी; वृद्ध महिलेचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -