घरमुंबईस्काय वॉकचा भाग कोसळून तीन महिला जखमी

स्काय वॉकचा भाग कोसळून तीन महिला जखमी

Subscribe

वांद्रे येथील एस. व्ही. रोड येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळल्यामुळे तीन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोड येथील स्कायवॉकचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. अ‍ॅक्रॅलिक शीटखाली हा भाग कोसळून अपघात झाला असून या दुर्घटनेत तीन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमध्ये जखमी झालेल्या महिलांना नजीकच्या हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले आहे?

मुंबईत वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे वांद्रे येथील स्कायवॉकला लावण्यात आलेली अ‍ॅक्रॅलिक शीट निखळून खाली चालत असलेल्या तीन पादचाऱ्यांवर पडल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमध्ये मालिसा नजरात (३०) , सुलक्षणा वझे (४१) , तेजल कदम (२७) या महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -