घरमहाराष्ट्रशिक्षकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही - विनोद तावडे

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही – विनोद तावडे

Subscribe

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले आहे.

राज्यातील विविध आस्थापनावरील वेतनाचा खर्च नियंत्रित करण्याकरीता वित्त विभागाने मनुष्यबळाची मागणी ३० टक्के कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. खर्चात काटकसर करण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजनेत शासन मान्यतेशिवाय कोणत्याही शिक्षक किंवा शिक्षकेतर पदांना मान्यता न देणे, शिक्षकांची परस्पर भरती न करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यासोबतच शिक्षकांच्या सर्व बाबी तपासून शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज लक्षवेधीला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले आहे. सदस्य कपिल पाटील यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री श्रीकांत देशपांडे, सतीश चव्हाण यांनी भाग घेतला होता.

शिक्षक भरतीसंदर्भात कार्यवाही

शिक्षक भरतीविषयी ‘पवित्र’ ही संगणकीय प्रणाली जुलै २०१८ मध्ये कार्यान्वित करण्यात आली असून उमेदवारांच्या वैयक्तिक माहिती नोंदणीचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. संस्थांकडून बिंदूनामावली नोंद करण्याची कार्यवाही सुरू असून १३२ संस्थांनी संगणकीय प्रणालीत नोंद केली आहे. बिंदुनामावली नोंदीच्या टप्प्याअंती रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करून शिक्षक भरतीसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

- Advertisement -

संबंधित बातम्या – 

वाचा – कपिल पाटील दुतोंडी तर मनीषा कायंदे सभागृहात नवख्या – विनोद तावडे

वाचा – विनोद तावडेंनी सर्व शिक्षा अभियानाचा खेळ खंडोबा केला – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -