घरमुंबईमुंबई - अहमदाबाद महामार्गावर १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई – अहमदाबाद महामार्गावर १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Subscribe

गुजरातहून मुंबईकडे हायड्रोजन सिलेंडर घेऊन येणारा ट्रक अचानक उड्डाणपुलावर पलटी झाला. या अपघातानंतर हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली.

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. काल संध्याकाळपासून या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागत आहे. चारोटी उड्डाणपुलावरील अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. काल सायंकाळी ४ वाजता हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी होऊन त्याला भीषण आग लागली होती. अद्याप हा ट्रक बाजूला काढण्यात आला नाही. तसंच सिलेंडर रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर आणि गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर जवळपास १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. उड्डाण पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु आहे.

अशी घडली घटना

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी नाका येथे सातत्याने अपघात घडत असून २०१३ साली याच ठिकाणी टँकरचा भीषण स्फोट झाला होता. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल झाली. गुजरातहून मुंबईकडे हायड्रोजन सिलेंडर घेऊन येणारा ट्रक अचानक उड्डाणपुलावर पलटी झाला. या अपघातानंतर हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यामध्ये ब्रिजखाली असणाऱ्या टाटा मॅजिक गाडीला देखील आग लागून ती जळून खाक झाली. या स्फोटामुळे आजूबाजूच्या वाहनांचे नुकसान झाले. या अपघातात ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर चार जण किरकोळ जखमी झाले.

- Advertisement -

अपघातानंतर सिलेंडरचा स्फोट

हायड्रोजन सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी होताच सिलेंडर लिकेज झाल्याने ट्रकने पेट घेतला. तर ट्रकमधील काही गॅस सिलेंडर पुलावरून खाली पडले. त्या सिलेंडरचा देखील स्फोट झाला. यामध्ये हायड्रोजन गॅस असल्याने आग झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे उड्डाण पुलाखालून वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांनी पेट घेतला यामध्ये जीवित हानी झाली नाही. त्यानंतर दोन तासाने अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या अपघातानंतर दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -