घरताज्या घडामोडीमराठा समाजासाठीचे सरकारचे निर्णय अपुरेच; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका!

मराठा समाजासाठीचे सरकारचे निर्णय अपुरेच; मराठा क्रांती मोर्चाची भूमिका!

Subscribe

मंगळवारी राज्य सरकारने मराठा समाजासाठी एकूण ९ असे फायदेशीर निर्णय घेतल्यानंतर आज या निर्णयांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषत: मराठा समाजातून या निर्णयांवर असमाधान व्यक्त केलं जात आहे. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनातील एख प्रमुख नेते असलेले खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांसाठी आभार मानतानाच ते पुरेसे नसल्याची भूमिका जाहीर केलेली असतानाच आता मराठा क्रांती मोर्चाने देखील तशीच भूमिका घेत ‘सरकारने मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय पुरेसे नाहीत’, असं जाहीर केलं आहे. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून (Maratha Kranti Morcha) राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणणं आहे मोर्चाचं?

सारथी संस्था स्वायत्त आहे असं आजपर्यंत सरकारकडून तोंडी अनेकदा सांगितलं गेलं. पण त्यासंदर्भातला जीआर अद्याप काढला गेलेला नाही, अशी तक्रार यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. तसेच, ‘सारथीसाठी सरकारने १३० कोटींची तरतू केली आहे. ती किमान १ हजार कोटींची तरतूद व्हायला हवी. जेणेकरून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फीमाफीसारख्या सवलती देता येतील. तसेच, २५ लोकांची सारथीवर नियुक्ती करण्यात यावी. सध्या फक्त दोनच लोकं आहेत’, असं देखील यावेळी पत्रकार परिषदेत नमूद करण्यात आलं.

- Advertisement -

दरम्यान, आज सकाळीच खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी देखील या निर्णयांवर आपली नाराजी बोलून दाखवली होती. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर असमाधान व्यक्त करताना (Sambhaji Raje Bhosle) संभाजीराजे म्हणाले, ‘कॅबिनेटने ९ निर्णय मराठा समाजासाठी घेतले. त्यासाठी सरकारचे आभार. पण मी त्यासाठी पूर्णपणे समाधानी नाही. सारथीसाठी १३० कोटी दिले, अण्णासाहेब विकास महामंडळाला ४०० कोटी, स्कॉलरशिपसाठी ६०० कोटी दिले. हा सकारात्मक दृष्टीकोण असला तरी हे आकडे पुरेसे नाहीत. सारथी बार्टीप्रमाणे चालायला हवी. सारथी स्वायत्त करायला हवी होती. ३२ कोटी मराठा समाजाला १३० कोटींमध्ये काय होणार आहे? त्यासाठी किमान १ हजार कोटी वर्षाला द्यायला हवेत. खऱ्या अर्थाने सारथी उभी करायची असेल तर १३० कोटींमध्ये काहीही होणार नाही’.


वाचा सविस्तर – Maratha Reservation : सरकारच्या निर्णयावर छत्रपती संभाजीराजे असमाधानी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -