घरमुंबईबोगस प्रमाणपत्रावर आता आळा बसणार

बोगस प्रमाणपत्रावर आता आळा बसणार

Subscribe

नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी (नॅड ) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर मागील सहा वर्षाच्या ११ लाख पदव्यांचा तपशील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या सुविधेमुळे बोगस प्रमाणपत्रावर आळा बसणार आहे.

मुंबई विद्यापीठाने नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी (नॅड ) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर मागील सहा वर्षाच्या ११ लाख पदव्यांचा तपशील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नॅडच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक तपशील तत्काळ ऑनलाईन उपलब्ध होईल. याद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी होणार आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणांना आळा बसणार आहे. या सेवेसाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ( एनएसडीएल ) या संस्थेची नियुक्ती केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठात नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएलसोबत मुंबई विद्यापीठाने करार केलेला आहे.

‘या’ संकेतस्थळावर मिळणार माहिती

विद्यापीठाने २०१३ पासून ते २०१९ पर्यंतची सहा वर्षाची ११ लाख विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती या नॅडच्या ऑनलाईन पोर्टलवर करून दिलेली आहे. या सुविधेचा उपयोग करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नॅडच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर मुख्य पृष्ठावर स्क्रोलींगमध्ये ऑनलाईन नॅड रजिस्ट्रेशन या सदराखाली एक लिंक उपलब्ध करुन दिलेली आहे. यासंदर्भात एनएसडीएलचे प्रतिनिधी नोंदणी करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध महाविद्यालयास भेटी देणार आहेत. तसेच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील हे सध्या जिल्ह्यानिहाय प्राचार्यांच्या बैठका घेत आहेत, त्यामध्ये प्राचार्यांना त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे निर्देश देत आहेत.

- Advertisement -

वर्षनिहाय उपलब्ध पदवीचा तपशील

२०१४ : १,९३,३९८
२०१५ : १,८५,४६७
२०१६ : १,६१,९१४
२०१७ : १,६८,७४३
२०१८ : १,८९,५३८
२०१९ : १,९३,५८९
एकूण : १०,९२,६४९

२०१९ चा विद्याशाखानिहाय उपलब्ध असलेला तपशील

मानव्य विद्याशाखा : २४,२८२
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा : ५४,९८०
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : १,०६,७२४
आंतरविद्याशाखा : ७,६०३
एकूण : १,९३,५८९

देशातील तसेच विदेशातील शासकीय,खासगी आस्थापना, विद्यार्थी व इतरांना या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी ऑनलाईन स्वरूपात तात्काळ करण्याची सुविधा यात असल्याने पडताळणीसाठी येथून पुढे विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी त्वरित नोंदणी करावी.
– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -