घरदेश-विदेशहवाई हल्ल्यावेळी बालाकोटमध्ये ३०० मोबाईल होते अॅक्टिव्ह - एनटीआरओ

हवाई हल्ल्यावेळी बालाकोटमध्ये ३०० मोबाईल होते अॅक्टिव्ह – एनटीआरओ

Subscribe

पुलवामा हल्ल्याच बदला घेत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या बालाकोट येथील जैशच्या तळावर मिराज २००० या विमानाने हल्ला केला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीतील घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. बालाकोटमध्ये असलेल्या जैशच्या तळावर हल्ल्यानंतर किती दहशतवादी ठार झाले यावरुन सत्ताधारी आणि विरोधक समोरा-समोर आले आहेत. दरम्यान, भारतीय गुप्तचर विभागाने एक खुलासा केला आहे. त्यानुसार ज्यावेळी हवाई दलाने जैशच्या तळावर हल्ला केला. त्यावेळी दहशतवादी तळामध्ये ३०० मोबाईल फोन अक्टिव असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन त्याठिकाणी किती दहशतवादी असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो असे देखील सुत्रांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

३०० मोबाईल अॅक्टिव्ह होते

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवाई दलाला पाकिस्तानच्या खैबर पुख्तुनख्वा प्रांतात दहशतवादी तळावर हल्ला करण्याची परवानगी मिळाल्यानंतर हवाई दलाने लक्ष्यभेद करण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (एनटीआरओ) तळांवर देखरेख ठेवण्यास सुरुवात केली होती. देखरेख सुरु असताना दहशतवादी तळावर ३०० मोबाईल फोन अॅक्टिव असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हवाई दलाने त्याठिकाणावर बॉम्बहल्ला केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ऐवढेच नाही तर देशामधील इतर देखील गुप्तचर यंत्रणा एनटीआरओच्या संपर्कात होत्या. त्यांना देखील या ठिकाणी ३०० मोबाईल फोन अॅक्टीव असल्याचे दिसून आले होते.

- Advertisement -

मिराज २००० ने केला हल्ला

१४ फेब्रुवाराली जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच बदला घेत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या बालाकोट येथील जैशच्या तळावर मिराज २००० या विमानाने हल्ला केला. या एअर स्ट्राईकमध्ये जैशचे २५० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र पाकिस्ताने हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर आता गुप्तचर यंत्रणेने केलेल्या खुलाशामध्ये जैशच्या तळावर ३०० मोबाईल अॅक्टीवेट असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -