घरमुंबईआदिवासींच्या समाज जीवनावर मुंबई विद्यापीठ करणार संशोधन

आदिवासींच्या समाज जीवनावर मुंबई विद्यापीठ करणार संशोधन

Subscribe

पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या समाज जीवनावर मुंबई विद्यापीठातर्फे संशोधन करण्यात येणार आहे. हे संशोधन इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

आदिवसींचे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचे प्रश्न, बदलत्या चालीरिती याबद्दल सर्वसामान्य नागरिक अनभिज्ञ असतात. त्यामुळे आदिवासींच्या जीवनावर प्रकाश टाकता यावा, त्यांच्या समाज जीवनाचा अभ्यास व्हावा या उद्देशाने आदिवासीबहुल असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या समाज जीवनावर मुंबई विद्यापीठातर्फे संशोधन करण्यात येणार आहे. हे संशोधन इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात शहरीकरणाची प्रक्रिया सुरू आहेत. यामध्ये गृह उद्योग, रस्ते बांधकामे होत आहेत. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. त्यामुळे जंगलाबरोबरच वन्यजीव, वनस्पती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. परिणामी पर्यावरणात सातत्याने बदल होत आहेत. वनसंपदा नष्ट होत असल्याने त्याचा परिणाम आदिवासींच्या जीवनावर होत आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक जीवन बदलू लागले आहे. आदिवासींमध्ये वारली, कातकरी यांनी आपली संस्कृती अद्यापपर्यंत टिकवून ठेवली होती. मात्र बदलत्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे आदिवासींच्या समाज जीवनात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाचे समकालीन प्रश्न, बदलत्या चालीरीती, पर्यावरणात होणारे बदल ह्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवन पद्धतीवर मुंबई विद्यापीठातर्फे संशोधन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च व मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील आदिवासीच्या समाजजीवनचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी पालघर येथे अभ्यास दौरा केला. संशोधन प्रकल्पात मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. नमिता निंबाळकर, अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. मेधा तापियावाला, समाजशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. रिटा मालचे आणि संशोधन सहाय्यक अंजली सिंह, हर्शिता झाला ह्यांचा समावेश आहे. या संशोधन प्रकल्पामध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या दूर शिक्षण केंद्राचे सहाय्यक कुलसचिव अमेय महाजन यांच्यावर मार्गदर्शकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ह्या संशोधन प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील कौस्तुभ घरत आणि भालचंद्र साळवे हे क्षेत्रकार्य समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -